व्हिडिओमध्ये दिसतंय की, जॅकी श्रॉफ त्यांच्या गाडीत बसले आहेत आणि त्यांच्या समोर ट्रॅफिक जाममध्ये एक ॲम्ब्युलन्स अडकली आहे. ही ॲम्ब्युलन्स पुढे सरकू शकत नाहीये, हे पाहून त्यांना खूप राग आला. व्हिडिओ बनवताना ते म्हणाले, “जर ॲम्ब्युलन्स अशीच अडकून राहिली, तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वेळेत कसं पोहोचवता येईल? तो रस्त्यावरच प्राण सोडेल.”
advertisement
व्हिडीओ शेअर करत जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केला संताप
ते म्हणाले, “जर रुग्णाची जागा तुम्ही घेतली, तरच तुम्हाला हे समजेल, पण लोकांमध्ये इतकी समज कुठे आहे?” त्यांनी लोकांना अधिक संवेदनशील होण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, ॲम्ब्युलन्ससाठी वेगळा रस्ता बनवायला हवा, जेणेकरून कोणत्याही रुग्णाचा जीव धोक्यात येणार नाही.
'आमच्यात खूप वाद होतात', वडील महेश कोठारे यांच्यासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला आदिनाथ
जग्गू दादा सोशल मीडियावर सक्रिय
जॅकी श्रॉफ सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि ते पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेशही देत असतात. गेल्या आठवड्यात त्यांच्या ‘अंगार’ या चित्रपटाने ३३ वर्षं पूर्ण केली, त्यानिमित्त त्यांनी काही खास फोटोही शेअर केले होते. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, जॅकी श्रॉफ नुकतेच ‘हंटर-२’ या वेब सिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. यात त्यांच्यासोबत सुनील शेट्टी, अनुषा दांडेकर आणि बरखा बिश्त यांसारखे कलाकारही होते.