ज्याकाळी हेमा मालिनी बक्कळ मानधनावर काम करत होत्या तेव्हा त्यांनी एक चित्रपट कमी मानधनावर केला होता. त्या चित्रपटाचे नाव होते 'मीरा'. त्याचे दिग्दर्शन करत होते गुलजार आणि प्रेमजी हे प्रोड्युस करत होते. ते खूप वेळ तिच्या सोबच चित्रपट करण्यासाठी वाट पाहत होते.
( या आठवड्यात OTT वर पाहा 7 फिल्म आणि सीरिज; घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस )
advertisement
प्रेमजीना प्रत्येक वेळेस हेमा मालिनी या नकार द्यायच्या. तिने सांगितले होते की, तुम्ही जर पौराणिक काही किंवा मीरावरती चित्रपट केलात तर मी नक्की त्या चित्रपटात काम करेन. तिच्या सांगण्यावरुनच त्यांनी मीरा चित्रपट बनवायला घेतला. या चित्रपटात हेमाच्या विरुध्द विनोद खन्नाला दाखवले होते. या चित्रपटासाठी निर्मात्यांना नायकाला निवडने हे एक आव्हान बनले होते.
या चित्रपटावर काम करायला घेतल्यावर प्रेमजी एका महत्वाच्या गोष्टीवर येऊन अडकले. ते म्हणते चित्रपटाचे बजेट. हेमा मालिनी यांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी प्रेमजीना म्हणाल्या, "हा चित्रपट मी भगवान कृष्णांच्या भक्ती प्रती प्रेम, आस्था आणि श्रध्देसाठी करणार आहे. मी तुमच्याकडून मानधन घेणार नाही. तुम्ही श्रध्देने जे काही द्याल ते घेईन." निर्मात्यांना वाटले की हा चित्रपट चालेल. चित्रपटवर खर्चही खूप केला होता. परंतू 'मीरा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
चार दशकाच्या करियरमध्ये हेमा मालिनी यांनी 150 चित्रपट केले. आपल्या करियरमध्ये त्यांनी 'सीता और गीता', 'प्रेम नगर', 'अमीर गरीब', 'शोले', 'महबूबा', 'चरस' और 'ड्रीम गर्ल' या चित्रपटांमध्ये काम केले होते.
