हुमा कुरेशीचं नाव अनेकदा अभिनय प्रशिक्षक रचित सिंग सोबत जोडले गेले. आता मात्र दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे. हुमा आणि रचित यांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यांचा जवळीक दाखवणारा एक फोटो त्यांच्या कॉमन फ्रेंडने शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “हुमा, तुला स्वर्गाचा छोटासा तुकडा मिळाला, अभिनंदन.” यानंतरच या नात्याची जोरदार चर्चा सुरु झाली.
advertisement
चाहते रक्ताने लिहायचे पत्र, तिच्या फोटोशी करायचे लग्न; ही 50 वर्षीय अभिनेत्री कोण?
रचितने स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीतही हुमा सोबतचा फोटो टाकला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “दोन काट्यांमधला गुलाब... प्रेम आणि सेलिब्रेशनसाठी धन्यवाद.” यापूर्वीही सोनाक्षी सिन्हा–झहीर इक्बालच्या लग्नात हुमा आणि रचित एकत्र दिसले होते.
कोण आहे रचित सिंग?
रचित हा केवळ अभिनय प्रशिक्षकच नाही, तर अभिनेता देखील आहे. त्याने आलिया भट्ट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा आणि सैफ अली खान यांना अभिनयात मार्गदर्शन केलं आहे. अलीकडेच तो रवीना टंडन आणि वरुण सूदच्या ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सिरीजमध्ये दिसला होता.
हुमा कुरेशीचं करिअर सध्या जोरात आहे. ती लवकरच ‘जॉली एलएलबी 3’ मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसीसोबत दिसणार आहे. याशिवाय, ती मृणाल ठाकूरसोबत ‘पूजा मेरी जान’ मध्ये दिसेल, ज्यात ती वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे. ‘पिंक’ या चित्रपटात ती ऑटो-रिक्षा चालकाची भूमिका करताना दिसेल. तसेच चाहत्यांच्या आवडत्या मालिकेचा पुढील भाग ‘महाराणी 4’ मध्ये ती पुन्हा राणी भारतीच्या दमदार भूमिकेत झळकणार आहे.