जया प्रदा यांनी 2004 साली समाजवादी पार्टीच्या तिकिटावर रामपुरमध्ये खासदारकीसाठी उभ्या राहिल्या आणि जिंकल्या. पण 2019मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतला. जया प्रदा यांच्याकडे बक्कळ संपत्ती आणि पैसा आहे. त्यांची संपत्ती किती आहे पाहूयात.
हेही वाचा - जया प्रदांआधी या अभिनेत्रींनी खाल्लीय जेलची हवा; नावं वाचून बसेल धक्का
advertisement
जया प्रदा यांना पहिल्यापासून डान्सची प्रचंड आवड होती. 14व्या वर्षी त्यांनी शाळेत डान्स केला होता तेव्हा एका तेलुगू दिग्दर्शकानं त्यांना पाहिलं आणि भूमि कोसम या सिनेमात डान्स करण्याची ऑफर दिली. या सिनेमात 3 मिनिटांच्या गाण्यावर डान्स करण्यासाठी जया प्रदा यांना 10 रूपये मानधन मिळालं होतं.
2019 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जयाप्रदा यांनी सांगितले होते की, त्यांचं एकूण उत्पन्न सुमारे 31 लाख 29 हजार रुपये आहे. त्यांची एकूण संपत्ती 9 कोटी 27 लाखू रूपये असून, त्यांच्याकडे साडेचार लाख रूपयांची कॅश आहे.
जया प्रदा यांचे, गुडगाव, चेन्नई, मुंबई, हैद्राबाद सारख्या शहरात काही घर आहे. प्रतिज्ञापत्रानुसार जयाप्रदा यांच्याकडे दोन किलो सोने आणि दीड किलो चांदी होती. त्यांची एकूण स्थावर मालमत्ता 18.65 कोटी रूपये आहे. तरीही त्या 1.55 कोटींच्या कर्जात बुडाल्या आहेत.
इतकंच नाही तर त्या महागड्या गाड्यांच्याही शॉकिन आहेत. त्यांच्याकडे Mercedes Benz, Outlender, Ford Endeavor, Ford Ikon आणि Xylo Mahindra सारख्या लग्झरी गाड्या आहेत. यातील प्रत्येक गाडीची किंमत लाखांच्या घरात आहे.