मुंबईतील सर्वात जुन्या आणि बहुमजली फिल्म स्टुडिओंपैकी एक स्टुडिओ म्हणजे फिल्मीस्थान स्टुडिओ. या स्टुडिओची विक्री करम्यात आली आहे. Arcade Developers या कंपनीनं हा स्टुडिओ तब्बल 183 कोटींना विकत घेतला आहे. हा करार 3 जुलै 2025 रोजी झाला असून मुंबईतील एक ऐतिहासिक युग संपलं आहे. 1940 पासून भारतीय चित्रपटसृष्टीला आकार देणारी ऐतिहासिक मालमत्ता होती.
advertisement
( Kantara Chapter 1 on OTT : वेट इज ओवर! 500 कोटी कमावणारा 'कांतारा चॅप्टर 1' ओटीटीवर, पण कोणत्या? )
काजोल-राणी मुखर्जी यांचं खास कनेक्शन
फिल्मीस्थान हा स्टुडीओ 1943 मध्ये अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचे आजोबा यांच्या आजोबा शशधर मुखर्दी यांनी केली होती. त्यांच्यासोबत अशोक कुमार, ग्यान मुखर्जी आणि राय बहादुर चुनीलाल हे सहसंस्थापक होते. बॉम्बे टॉकीजपासून विभक्त झाल्यानंतर हा स्टुडिओ उभारण्यात आला होता. हा स्टुडिओहिंदी चित्रपट निर्मितीचं केंद्र बनला. त्या काळी स्टुडिओ केवळ शूटिंगसाठी जागा नव्हते, तर कलाकारांना मासिक पगारावर काम देणाऱ्या निर्मिती संस्था होत्या.
कुठे आहे फिल्मीस्थान स्टुडिओ
फिल्मीस्थान हा स्टुडिओ गोरेगाव पश्चिमेतील एसवी रोडला आहे. 4 एकरच्या जागेत हा स्टुडिओ बांधण्यात आला आहे. Arcade Developers कंपनीने तिथे सुमारे 3,000 कोटींच्या अंदाजे मूल्यासह एक अल्ट्रा लग्झरी रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट उभारण्याची योजना आखली आहे. या प्रोजेक्टमध्ये 3, 4 आणि 5 BHK फ्लॅट्स, दोन 50 मजली टॉवर्स असतील. प्रकल्पाचं उद्घाटन 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.
फिल्मीस्थान स्टुडिओमध्ये बॉलिवूडचे अनेक गाजलेले सिनेमे, टीव्ही शो आणि जाहिराती शूट झाल्या आहेत. साऊंड स्टेज, ओपन सेट आणि मध्यवर्ती लोकेशनमुळे फिल्मीस्तानने अनेक वर्ष इंडस्ट्रीला आधार दिला. 'अनारकली', 'पेइंग गेस्ट' सारख्या अनेक सिनेमाचं शूटींग इथे झालं आहे.
