अभिनेत्री काजोलने 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये तिच्या मुलीला सोशल मीडियावर ट्रोल केल्याप्रकरणी खुलासा केला आहे. या ट्रोलिंग बद्दल तिला खूपच वाईट अनुभव आले होते. तिची मुलगी मानसिकरित्या खचली होती. तिने या शो मध्ये तिची मुलगी न्यासावर या ट्रोलिंगचा काय परिणाम झाला ते सांगितले आहे.
न्यासा लहान होती तरीही एवढ्या घाण..
advertisement
काजोल या शोमध्ये म्हणाली की, "तिचे लहानपणीचे खूप फोटो आहेत. ज्या फोटोंवरती नेटकऱ्यांनी खूप वाइट कमेंट्स केल्या आहेत. पण लहान मुले ही मुले असतात. त्यांचे केसं नीट नसतात, ते साध्या कपड्यांवर इकडे तिकडे खेळत असतात. ते थोडीच एयरपोर्ट लुकसारखे डिझाइनर कपडे घालून असणार. मला आठवते की या कमेंट्समुळे न्यासाला खूपच वाइट वाटले होते. माझी दोन्ही मुले दु:खी झाली होती. न्यासा तर खूपच तणावात होती."
काजोलच्या म्हणण्यानूसार अशा ट्रोलिंगचा आणि मानसिक छळाचा लहान मुलांच्या मानसिकतेवर वाइट परिणाम होतो. पण न्यासाने अजून सिनेसृष्टीत पदार्पण केले नाहीये. काही वेळा माध्यमातून न्यासाच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक केले जाते. काजोलने व्यक्त केलेल्या या मतामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
