या चॅट शोमध्ये एक असा सेगमेंट आहे, जिथे पाहुण्यांना चर्चा करण्यासाठी एक विषय दिला जातो आणि त्यांना 'सपोर्ट' किंवा 'विरोध' करायचा असतो. यावेळी चर्चेचा विषय होता, 'भारतीय लोकांना फेअरनेस क्रीम खरेदी करण्यापेक्षा कंडोम खरेदी करताना जास्त लाज वाटते.'
भारतीय कसे करतात कंडोमची खरेदी
काजोलने या विषयाला सपोर्ट करत एक मजेदार किस्सा सांगितला. ती म्हणाली, "लोकांना लाज वाटते! फेअरनेस क्रीम खरेदी करायला जा, तर ते सहज म्हणतात, 'ती शाहरुख खानची क्रीम द्या.' पण कंडोम खरेदी करताना लोक अवघडतात आणि लाजतात."
advertisement
मनीष मल्होत्रा आणि ट्विंकल खन्ना यांनी मात्र या विषयाला विरोध केला. मनीष म्हणाला, "भारत बदलला आहे आणि आता असे काहीही नाही." या विषयावर वाद रंगलेला असताना, सोनाक्षी सिन्हाने एक असा प्रश्न विचारला, ज्यामुळे काजोललाही हसू आले. मनीष मल्होत्रा जेव्हा 'भारतात आता कोणालाच कंडोम खरेदी करताना भीती वाटत नाही' असे सांगत होते, तेव्हा सोनाक्षीने लगेच विचारले, "मग आपली लोकसंख्या इतकी जास्त का आहे?"
सोनाक्षी पुढे म्हणाली, "यावरून हे स्पष्ट होते की, बहुतेक लोक कंडोम खरेदी करत नाहीत!" यावर मनीष मल्होत्रा यांनी सहमती दर्शवली नाही. एकूणच, या एपिसोडमध्ये भारताच्या लैंगिक शिक्षणाबद्दल असलेल्या दोन वेगवेगळ्या मानसिकतेचे दर्शन घडले.
