दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'वर ऋषभ शेट्टी बोलला!
ईटाईम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत ऋषभ शेट्टीने अशाच आशयाच्या आणखी एका चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. हा चित्रपट म्हणजे मराठीत सुपरहिट ठरलेला दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला 'दशावतार'! बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांना तगडी टक्कर देत या मराठी चित्रपटनेही बॉक्स ऑफिसवर प्रभावी कामगिरी केली आहे.
advertisement
'दशावतार' चित्रपट पाहण्याची संधी मिळाली का, असे विचारल्यावर ऋषभ शेट्टी म्हणाला, "मी त्याबद्दल ऐकले आहे आणि खूप चांगला अभिप्रायही मिळाला आहे, पण आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे मला तो पाहता आला नाही. पण आमचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तो नक्कीच पाहणार आहे."
चित्रपटाच्या संहितेचं केलं कौतुक
या प्रकारच्या कथांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना ऋषभ शेट्टी म्हणाला, "मुळं, संस्कृती आणि जंगलाच्या कथांवर चित्रपट बनवले जात आहेत, हे खूपच छान आहे. हे विषय लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत; ते मनोरंजक असतात, विचार करायला लावणारे असतात आणि महत्त्वाचे म्हणजे, ते भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून काम करतात."
सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेला 'दशावतार' हा कोकणातील संस्कृती आणि सामाजिक समस्यांवर आधारित नाट्य-थरारपट आहे, ज्याने आतापर्यंत २३.०२ कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे, ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' भारतात २५६.५० कोटी रुपयांची कमाई करत आपला यशस्वी प्रवास कायम ठेवत आहे.