या शोमध्ये 'ट्रुथ ऑर लाय' नावाचा एक राऊंड होता, ज्यात करण जोहरला एक सत्य आणि एक असत्य विधान करायचे होते. जान्हवी कपूरने करणला 'सर्वात सनसनाटी खुलासा' करण्याची विनंती केली. यावर करण जोहरने दोन विधाने केली. पहिले विधान होते, "मी २६ वर्षांचा असताना माझी वर्जिनिटी गमावली." आणि दुसरे विधान ऐकताच जान्हवी कपूरला मोठा धक्का बसला. करण म्हणाला, "आणि माझा तुमच्या कुटुंबातील एका सदस्यासोबत इंटीमेट संबंध होता!"
advertisement
ट्विंकलने थेट 'बोनी कपूर'चे नाव घेतले!
करण जोहरचे हे विधान ऐकून जान्हवी कपूर आश्चर्याने स्तब्ध झाली, तर ट्विंकल आणि काजोल यांना हसू आवरले नाही. ट्विंकल खन्नाने लगेच गंमत करत विचारले, "तो बोनी कपूर तर नाही?" ट्विंकलच्या या मजेशीर प्रश्नावर सगळेच हसू लागले.
यानंतर करण जोहरने खुलासा केला की, वर्जिनिटी गमावल्याची गोष्ट खरी आहे, पण जान्हवीच्या कुटुंबातील सदस्यासोबत इंटीमेट संबंधाची गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. मात्र, खोटी गोष्ट सांगतानाही करणने एक खुलासा केला. तो म्हणाला, "मी त्या पार्टीत उशिरा पोहोचलो होतो, त्यामुळे हे होऊ शकलं नाही. पण हा विचार माझ्या मनात काही वेळा आला होता."
'इमोशनल चीटिंग'वर काजल-ट्विंकल-करण ट्रोल
या शोमधील आणखी एका व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर आहे. यात करण, काजोल आणि ट्विंकल हे तिघेही फिजिकल चीटिंगपेक्षा इमोशनल चीटिंग जास्त वाईट असते, या मतावर ठाम होते, तर जान्हवीने दोन्ही प्रकारची फसवणूक सारखीच असते, असे मत मांडले. यावर तिघांनी तिला, 'वेळेनुसार तुला हे पटेल' असे समजावून सांगितले. याच वक्तव्यावरून सोशल मीडियावर सध्या या तिघांनाही जोरदार ट्रोल केले जात असून बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलेब्स चीटिंगला एकप्रकारे प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात आहे.
