कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच सूरजच्या गावी जाऊन त्याला भेटून आली. मात्र तिला त्याच्या मोढवे गावी गेल्यावर एक वेगळंच चित्र दिसलं. ज्यामध्ये सूरजचा वापर करून घेतला जातोय आणि तिला मिळालेल्या वागणुकीविषयी तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर सगळं शेअर केलं. अंकिता म्हणाली, ''मी सूरजला भेटून आले मात्र तिथे एक वेगळंच वातावरण होतं. सूरज आणि त्याची बहिण खूप चांगली आहेत मात्र बाकीचे लोक त्यांचा वापर करून घेत आहेत. सगळे मला कमेंट करत विचारत आहेत तू इतक्या लेट आली कसं वाटतंय आणि त्याला नॉमिनेट केल्यावरून चुकीच्या गोष्टी घेत आहेत. मला याविषयी बोलायचं नव्हतं मात्र मला सतत याविषयावरून कमेंट येत आहेत त्यामुळे मी यावर बोलत आहे.''
advertisement
साऊथ इंडस्ट्रीत 'या' मराठी चेहऱ्यांचा दबदबा, अभिनयाची पाडली छाप!
अंकिता पुढे म्हणाली, ''मी सूरजला भेटून आल्यावर मी पोस्ट टाकल्या आणि त्याच्यासोबत कोलॅब केलं. मात्र माझं असं काहीच म्हणणं नव्हतं की त्यानेही पोस्ट टाकाव्यात किंवा कोलॅब अॅक्सेप्ट करावं. मात्र येणाऱ्या कमेंटमुळे मला समजलं की मला अनफॉलो करण्यात आलं होतं. परत फॉलो करून कोलॅब अॅक्सेप्ट केलं आणि परत काढलं. मला या गोष्टींमध्ये अडकायचं नाही. मी कामात बिझी आहे पण मला माझ्या चाहत्यांसाठी हे क्लिअर करावं लागतंय. जेणेकरून कोणीही सूरजला चुकीचं समजू नये. तो साधा भोळा आहे. लोक त्याला जसं बोलायला वागायला सांगतील तसं तो वागतो. त्यामुळे त्याची यामध्ये काही चूक नाही.''
''माझी महाराष्ट्राच्या जनतेला एकच विनंती आहे की तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलं आता तो सूरज राहिलेला नाहीये. बिग बॉसच्या घरात होता आता तो तसा राहिलेला नाहीये. गणपतीची माती कशी असते तुम्ही त्याला जो आकार द्याल तसं ते घडतं जातं, सूरजचंही असंच झालंय. त्याला जसा आकार द्याल तसा तो करतो. तो स्वतःचं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला जे सांगतील तसं तो करतो. त्याला खूप चुकीचं गाइड करतात.''
Suraj Chavan: सूरज चव्हाणला मिळालं महागडं गिफ्ट, नाव घेणंही झालं अवघड, पाहा मजेशीर VIDEO
दरम्यान, अंकिता म्हणाली ''मी 1 तासात पोहोचेल असं सांगूनही सूरज घरी नव्हता. आल्यावरही तो न भेटता आधी घरात गेला आणि मग आम्ही त्याला भेटलो. हे सगळं सूरजचं डोकं नाहीये तो असा नाहीये. मी त्याला चांगलं ओळखते. पण बाकीचे लोकांमुळे तो असं वागतो. आता मी या दलदलीत पडणार नाही. मला शक्य असेल तेवढं मी त्याच्याकडे लक्ष देऊन पण आता माझ्याकडून काही अपेक्षा नसाव्यात.''