चौथ्या वीकेंडलाही कमाईचा धडाका
१ जानेवारी २०२६ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यशाची नवनवीन शिखरे पार केली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, चौथ्या वीकेंडला (२४ आणि २५ जानेवारी) या चित्रपटाने २.७७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाची आतापर्यंतची एकूण नेट कमाई २३.२६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ४ ते ६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल ४०० टक्क्यांहून अधिक नफा मिळवत २०२६ चा पहिला सुपरहिट मराठी सिनेमा होण्याचा मान मिळवला आहे.
advertisement
'आता मोकळा श्वास घेता येईल', अरिजीत सिंगच्या रिटायरमेंटवर खुश झाली बॉलिवूड सिंगर
'चलचित्र मंडळी'च्या अधिकृत सोशल मीडियावरुन याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सर्व स्पर्धा जिंकत आपली मराठी शाळा बोर्डात पहिली! अजून बराच प्रवास बाकी आहे… महाराष्ट्राचा महासिनेमा आता ऐतिहासिक वळणावर! ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात उदंड प्रतिसादात सुरू!'
का चालतोय हा सिनेमा?
'क्रांतिज्योती विद्यालय...' हा केवळ सिनेमा नाही, तर ती प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात घर केलेल्या 'मराठी शाळे'ची गोष्ट आहे. हेमंत ढोमेचे दिग्दर्शन आणि सचिन खेडेकर, क्षिती जोग, प्राजक्ता कोळी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भावुक केले आहे. "स्पर्धा कितीही मोठी असली, तरी आपली मराठी शाळा बोर्डात पहिलीच येणार," अशा भावना निर्मात्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
