माधुरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. माधुरी कॅनडामध्ये एका स्टेज शोसाठी गेली होती. त्या शोमध्ये माधुरी तिच्या 37 वर्ष जुन्या गाण्यावर थिरकली. तिच्या डान्स आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं पण लोकांनी नंतर माधुरीकडेच पैसे मागितले.
( माधुरी दीक्षितची ती फिल्म, सगळे म्हणाले फ्लॉप, बॅन करा; पण रिलीज होताच निघाली ब्लॉकबस्टर )
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचं कारणही माधुरीच ठरली आहे. कॅनडामधील स्टेज शोसाठी माधुरी तब्बल 3 तास उशिरा पोहोचली. अनेकांनी व्हिडीओ शेअर करत माधुरीच्या उशिरा येण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. माधुरीच्या टूरमध्ये सामील होऊ नका असंही अनेकांनी म्हटलं आहे. अनेकांनी तर आमचे पैसे परत करा असंही म्हटलं आहे.
माधुरीचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी एका युझरनं लिहिलंय, "तुम्हाला एक सल्ला देतो माधुरीच्या टूरमध्ये सहभागी होऊ नका. तुमचे पैसे वाचवा. दुसऱ्या युझरने लिहिलंय, वाईट ऑर्गनायझेशन, वेळेची बर्बादी"
माधुरीच्या उशिरा येण्यावरूनही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "हा आतापर्यंतचा सगळ्यात घटिया शो होता. अनऑर्गनाइज्ड. जाहिरातीमध्ये हे दाखवलं नव्हतं की, ती दोन सेकंद बोलणार आणि डान्स करणार. कितीतरी लोक अर्ध्यात निघून गेले. अनेकांनी पैसे परत मागितले आहेत. ती किती सुंदर आहे याचा कोणाला काही फरक पडत नाही."
दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय, "असा शो कोणी बघू शकत नाही. प्रेक्षकांच्या वेळेची किंमत नाहीये. तीन तास उशिर. शोची वेळ संध्याकाळी 7.30 वाजता होती. पण शो रात्री 10 वाजता सुरू झाला. प्रेक्षकांचा अपमान केला."
