टोरंटोमधील ग्रेट कॅनेडियन कॅसिनो रिसॉर्टमध्ये 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या "दिल से... माधुरी" लाईव्ह शो दरम्यान गोंधळ निर्माण झाला. प्रमोशनमध्ये "स्टेज पेटून उठेल" आणि "जादू, चाली" सारखी गाणी दाखवू असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु हा शो गा म्युझिक शो ऐवजी टॉक शो होता. शिवाय माधुरी तीन तास उशिरा पोहोचली. ज्यामुळे 200 डॉलर्स किंवा अंदाजे 16,800 किमतीची तिकिटे खरेदी करून आलेले तिचे चाहते प्रचंड संतापले. "स्कॅम,वर्स्ट शो, पैसे फुटक गेले, आमचे पैसे परत द्या अशा कमेंट करत लोकांनी सोशल मीडियावर राग काढला.
advertisement
( Pranit More : डेंग्यूमुळे प्रणित मोरे Bigg Boss 19 च्या घरातून OUT, बिग बॉसने त्याला किती पैसे दिले? )
माधुरीच्या मॅनेजमेन्ट टीमला जबाबादार धरलं
सोशल मीडियावरील ट्रोलिंगला उत्तर देताना आयोजकांनी एक निवेदन जारी केले. ते म्हणाले, "सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या कमेंटबाबतचे तथ्य आम्ही स्पष्ट करू इच्छितो. कार्यक्रम वेळेवर सुरू झाला. इंडियन आयडलच्या गायकांनी जोरदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे स्वरूप माधुरी दीक्षितच्या मॅनेजमेन्ट टीमसोबत शेअर करण्यात आलं होतं. ज्यामध्ये रात्री 8.30 वाजता प्रश्नोत्तरांचा सत्र होतं. त्यानंतर माधुरीने 60 मिनिटांचा कार्यक्रम सादर केला.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, "आमची निर्मिती टीम पूर्णपणे तयार होती, परंतु माधुरी दीक्षितच्या मॅनेजमेन्ट टीमने तिला चुकीचा कॉल टाइम सांगितला. त्यामुळे 7 ऐवजी माधुरी रात्री 10 वाजता कार्यक्रमाला पोहोचली. लोक तिची वाट पाहून कंटाळून गेली.
आयोजकांनी बॅकस्टेज परिस्थितीवरही प्रकाश टाकला. त्यांनी आरोप केला की, श्रेया गुप्तासारखे काही बॅकस्टेज सदस्य कलाकारांच्या समन्वयात मदत करण्याऐवजी स्वतःचे खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला.
व्हिडिओ पाहण्याचे आवाहन
आयोजक कंपनीने चाहत्यांना व्हिडिओ फुटेज पाहण्याचे आवाहन देखील केले आहे. त्यांनी सांगितले की, "आम्ही स्टेजिंग, लायटिंग, साऊंड आणि ऑडियन्स मॅनेजमेन्ट यासह सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. माधुरी दीक्षितच्या सादरीकरणाच्या व्हिडिओंमध्ये तिची उपस्थिती स्पष्टपणे दिसून येते. आम्ही जनतेला विनंती करतो की त्यांनी हे फुटेज पहावे आणि निष्पक्ष निर्णय घ्यावा."
