पुरस्कार सोहळ्यात मांडलं मत!
महेश मांजरेकर नेहमीच त्यांच्या मुलाखतींमध्ये मराठीसाठी आग्रही असतात. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…’ यांसारख्या चित्रपटांतूनही त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठी माणसांच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
नुकतंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महेश मांजरेकरांना "कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी" पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना त्यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या घटत्या संख्येबद्दल आपलं मत मांडलं. मांजरेकर म्हणाले, “मुंबईमध्ये मराठीपण कमी होत आहे. जे थोडंफार टिकलं आहे, ते पुणे आणि मुलुंडमध्ये आहे. आता तर शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरलेला नाही.”
महेश मांजरेकरांचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. कारण, शिवाजी पार्क हे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक हक्काचं ठिकाण मानलं जातं. विशेषतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बंगलाही याच परिसरात आहे. त्यामुळे मांजरेकरांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.