'तुम्ही म्हणता ते रागीट आहेत, गुंड आहेत, पण...', संजय मिश्रांनी सांगितला राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा खास अनुभव
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
‘घाशीराम कोतवाल’ हिंदीत येत असून अभिजीत पानसे दिग्दर्शक आहेत. संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर प्रमुख भूमिकेत. संहिता वसंत देव, दिग्दर्शन भालचंद्र कुबल यांचे आहे.
मुंबई : मराठी रंगभूमीवर गाजलेलं, पण अनेक वाद निर्माण करणारं नाटक ‘घाशीराम कोतवाल’ आता लवकरच हिंदीत येत आहे. अभिजीत पानसे या नाटकाचं दिग्दर्शन करत असून संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाच्या प्रमोशनमध्ये अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर सध्या व्यस्त आहेत. याच प्रमोशनदरम्यान संजय मिश्रा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा एक खूपच खास किस्सा सांगितला आहे.
संजय मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “अभिजीत पानसे मनसेचे पदाधिकारी आहेत, हे मला सुरुवातीला माहिती नव्हतं. त्यांच्या पक्षाच्या विचारांवर माझा काही आक्षेप नाही, पण याच माणसाने ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक हिंदीत आणलं, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.” यावेळी संजय मिश्रा यांनी ‘ऋत्विक घटक’ या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, ते विचारांनी साम्यवादी होते, पण मला त्यांचे चित्रपट खूप आवडायचे. मला अभिजीतच्या राजकीय विचारांनी काहीच फरक पडत नाही, असं संजय मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
advertisement
राज ठाकरे हिंदीत बोलायला लागले!
एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत राज ठाकरेंच्या भेटीबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले, “या नाटकादरम्यान एक दिवस राज ठाकरे यांनी आम्हाला भेटायला बोलावलं. ते सगळ्यांसोबत मराठीत बोलत होते. पण, मी तिथे बसताच ते म्हणाले, ‘संजय आला आहे, आता आपण हिंदीत बोलूया.’”
त्यानंतर मिश्रा म्हणाले, राज त्यावेळी एक पुस्तक वाचत होते, त्यामध्ये काही नोंदी होत्या. त्या नोंदी राजस्थानी भाषेतील होत्या आणि वाचत होते राज ठाकरे. आपण राज यांच्याबद्दल म्हणतो की ते असेच आहेत, ते रागीट आहेत, ते गुंड आहेत. पण जेव्हा तुम्ही त्यांना भेटता, तेव्हा तुम्हाला कळतं की ते काहीतरी वेगळेच आहेत.
advertisement
संजय मिश्रा यांनी ‘घाशीराम कोतवाल’ हिंदीमध्ये आणण्याचं श्रेय अभिजीत पानसे यांना दिलं. या नाटकाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांच्यासोबत भालचंद्र कुबल यांनीही केलं आहे. नाटकाची संहिता वसंत देव यांनी हिंदीत लिहिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुम्ही म्हणता ते रागीट आहेत, गुंड आहेत, पण...', संजय मिश्रांनी सांगितला राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा खास अनुभव