TRENDING:

Mamta Kulkarni : ड्रग्ज माफियासोबत लग्नगाठ? अखेर 25 वर्षांनी ममता कुलकर्णींने मौन सोडलं, म्हणाली...

Last Updated:

Mamta Kulkarni on marriage : तब्बल 25 वर्षांनी ममताने तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. तिने तिचं लग्नच झालं नसल्याचा दावा केला आहे. ममता नेमकं काय म्हणालीये?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनी भारतात परतली आहे. ममत कुलकर्णी भारतात आल्यानंतर तिच्या अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली. ड्रग्ज तस्करी ते आंतरराष्ट्रीय गुंडाबरोबर पळून जाण्यापर्यंत अनेक प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव आलं होतं. ममताने तिचा बॉयफ्रेंड आणि अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विक्की गोस्वामीबरोबर लग्न केलं आणि ती दुबईत स्थायिक झालं असं म्हटलं गेलं होतं. तब्बल 25 वर्षांनी ममताने तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. तिने तिचं लग्नच झालं नसल्याचा दावा केला आहे.
ममता कुलकर्णी
ममता कुलकर्णी
advertisement

ममता कुलकर्णीने म्हटलंय,  "मी विकीशी लग्न केलेलं नाही, तो माझा नवरा नाही, मी अजूनही अविवाहित आहे. मी कोणाशीही लग्न केलेलं नाही. विकी आणि माझं नातं होतं पण मी त्याला 4 वर्षांपूर्वीच ब्लॉक केलं. 25 वर्षे भारताबाहेर घालवली. मी 25 वर्षे भारताबाहेर होते, मी स्वतःच्या शोधात होते. आता कुंभमेळा होणार आहे म्हणूनच मी इथे आले आहे. पण मी पुन्हा चित्रपटसृष्टीत जाणार नाही. मी माझ्यावर खूश नाही. मी बिग बॉससाठी भारतात आले नाही. जेव्हा मी हे 2000 मध्ये काम केलं होतं तेव्हा मी भारत सोडला होता. मी चित्रपटसृष्टीतील एक टॉपची अभिनेत्री होते. माझ्याकडे 43 चित्रपटांच्या ऑफर होत्या, पण मी त्या नाकारल्या. मी हे सर्व सोडलं आता मला पुन्हा चित्रपटात यायचं नाही."

advertisement

( फोटोशूटसाठी उतरवले कपडे, अंडरवर्ल्डशी कनेक्शन; 25 वर्षांनी भारतात परतली अभिनेत्री )

"ड्रग्ज कार्टेलमध्ये  2015 मध्ये पोलिसांनी माझ्या नावावर जी केस नमूद केली तेव्हा मी विकीला ओळखत होते. मी केनियामध्ये विकीला भेटायला गेले होतो पण तिची भेट कोणाशी झाली हे मला माहीत नव्हते. पोलिसांनी माझं नाव ड्रग्ज प्रकरणात टाकलं पण माझा त्याच्याशी संबंध नव्हताय. आज न्यायालयाने मला सर्व आरोपातून मुक्त केलं आहे."

advertisement

ममता पुढे म्हणाली, "विकी एक चांगला माणूस आहे. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकजण त्याला भेटायला जायचा म्हणून मी त्याला भेटायला गेले. पण जेव्हा मी विक्कीला भेटलो तेव्हा मी शेवटचा माणूस आहे विक्कीबद्दल माहिती आहे. तो दुबईच्या तुरुंगात असताना मी त्याला सोडलं. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मी ध्यानात गेले. विकी 2012 मध्ये तुरुंगातून बाहेर आला. 2016 मध्ये तो सापडला त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आता हा माझा भूतकाळ आहे आणि मी तो विसरले आहे."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Mamta Kulkarni : ड्रग्ज माफियासोबत लग्नगाठ? अखेर 25 वर्षांनी ममता कुलकर्णींने मौन सोडलं, म्हणाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल