चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते आणि नंतर त्यांनी इंडियन ऑइल कंपनीत काम केले. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी १९८० च्या दशकात चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवल.
१२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले
अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'हम साथ रहना', 'हम साथ साथ है', 'परिणिता', 'लगे रहो मुन्ना भाई', 'व्हेंटीलेटर' अशा ऑल टाईम चर्चेत असणाऱ्या चित्रपटात केलेल्या कामासाठी त्यांचं अनेकदा कौतुक झालं आहे.
advertisement
आमिर खानच्या '3 इडियट्स'मध्ये निभावली प्रोफेसरची भूमिका
राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारून तो घराघरात नावारूपाला आले. 'क्या बात है' आणि 'कहना क्या चाहते हो?' असे त्यांचे डायलॉग्स पॉप कल्चरचा एक भाग बनले. आजही त्यांचे हे डायलॉग्स सोशल मीडियावर मीम्ससाठी खूप वापरले जातात.
टेलिव्हिजन क्षेत्रातही उमटवला ठसा
चित्रपटांव्यतिरिक्त, अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली. त्यांनी 'वागले की दुनिया', 'माझा होशील ना', 'मिसेस तेंडुलकर' आणि 'भारत की खोज' यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या बहुमुखी प्रतिभेच्या माध्यमातून टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले. अच्युत पोतदार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत खूप योगदान दिले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणून त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहील.