Marathi Actor Anshuman Vichare Wife : मराठी इंडस्ट्रीतील अनेक जोड्या नेहमीच चर्चेत असतात. पण काही कलाकारांच्या पत्नी या अभिनयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये नाव कमावताना दिसत आहेत. नुकतच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी वकील असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अभिनेत्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
महाराष्ट्राची हास्यजत्रा, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिनेता अंशुमन विचारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंशुमन विचारेची पत्नी अभिनयात सक्रीय नाही. पण तिच्या प्रोफेशनमध्ये ती खूप सक्रीय आहे. अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारे मुंबई उच्च न्यायालयात वकील आहे.
पल्लवी विचारे या वकील आणि समुपदेशक आहेत. पल्लवी आणि अंशुमन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. त्यांचं युट्यूब चॅनलदेखील आहे. युट्यूबवर वैयक्तिक आयुष्यासंबंधित गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतचं गणपतीत कोकणात गेले असताना तेथील गंमती आणि गणेशोत्सवाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांची लेक अन्वीदेखील सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
पल्लवीचं चाहत्यांकडून कौतुक!
पल्लवी विचारेने सोशल मीडियावर मुंबई उच्च न्यायालयाजवळील फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खूप छान, मन:पूर्वक अभिनंदन, शुभेच्छा, आता सेलिब्रिटींच्या केस तुम्हाला मिळणार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अंशुमन विचारेच्या पत्नीने लग्नाआधी अभिनयक्षेत्रात काम केलं आहे. काटा रुते कुणाला, कुकुचकू, आई अशा विविध मराठी मालिकांत त्यांनी काम केलं आहे.
अंशुमन विचारे अभिनेता असण्यासोबत दिग्दर्शक, निर्मातादेखील आहे. ऑस्कर विजेत्या श्वास या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने वेगवेगळे प्रोजेक्ट केले आहेत. छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या कार्यक्रमांचं तो सूत्रसंचालनही करत असतो.