Amruta Deshmukh Prasad Jawade : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडपं अर्थात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'झी मराठी अवॉर्ड 2025' हा दिमाखदार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री अमृता देशमुख आपला पती आणि 'पारू' फेम अभिनेता प्रसाद जवादेची एक वेगळी बाजू मांडताना दिसून आली. अमृताने शेअर केलेला हा किस्सा ऐकून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रसाद जवादेच्या आईला कॅन्सरचे निदान झाले आहे. आईला कॅन्सर झाल्याचं कळताच प्रसादने शूटिंग, घर, आईची तब्येत, बायकोसाठी वेळ या सर्व गोष्टी कशा पार पडल्या त्या अमृताने अभिमानाने सांगितल्या.
advertisement
अमृता देशमुख काय म्हणाली?
अमृता देशमुख म्हणाली,"मागच्यावर्षी दिवाळीत काकूंना कॅन्सर झाल्याचं आम्हाला कळलं. काकूंचं स्वप्न होतं की प्रसादला आता मला पुन्हा एकदा रोज छान टीव्हीवर किंवा एखाद्या डेली सोप मध्ये पाहायचं आहे. एकीकडे पारूचं शूट सुरू होतं आणि दुसरीकडे आम्ही त्यांची ट्रीटमेंट लगेचच सुरू केली. प्रसादला मी पाहिलंय की जी व्यक्ती कधीतरी अतिशय बालिश वाटू शकते, तो आधी बोलतो नंतर विचार करतो मग त्याला त्याचा त्रास होतो. असे त्याचे खूप पैलू आहेत. पण जेव्हा मी त्याला काकूंचाच वडील झालेलं पाहिलं तेव्हा मला अशी त्याची एक वेगळी बाजू दिसली.
उपस्थित असलेली प्रसादची आई म्हणाली,"माझ्याआधीच हॉस्पिटमध्ये प्रसादचं नाव सर्वांनी श्रावणबाळ पाडलं आहे आणि तो खरोखर श्रावणबाळासारखा आहे. आधुनिक काळातला हा श्रावणबाळ आहे. त्याला जे पारितोषिक मिळालं आहे ते तंतोतंत खरं आहे". पुढे उपस्थित असलेले सर्व कलाकार टाळ्या वाजवत प्रसादचं कौतुक करतात.
अमृता देशमुख आणि आईला बोलताना पाहून प्रसाजदा अश्रू अनावर झालेले पाहायला मिळालं. पुरस्कार सोहळ्यात प्रसाद जवादेला 'सर्वोत्कृष्ट मुलाचा' पुरस्कार मिळाला आहे.
प्रसाद आणि अमृताची 'बिग बॉस मराठी'च्या घरात चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही दिवसांतच ते लग्नबंधनात अडकले.