काही महिन्यांपूर्वी नितीन बोरकर यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. डी.वाय. पाटील रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
( प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली, रुग्णालयातील PHOTO समोर, दिसला या अवस्थेत )
advertisement
नितीन बोरकर यांच्या जाण्याने मराठी कला आणि चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. पडद्यामागे राहूनही त्यांनी सिनेमांच्या दृश्यभाषेला एक वेगळी ओळख दिली. त्यांच्या कामातील बारकावे, वास्तवतेची जाणीव आणि कथेला पूरक असलेली नेपथ्य रचना यासाठी ते ओळखले जात होते.
नितीन बोरकर यांनी अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत सातत्यानं काम केलं. त्यांनी आतापर्यंत जवळपास 40 हून अधिक सिनेमांसाठी कला दिग्दर्शन केलं आहे. ‘बॉईज 3’, ‘ती आणि ती’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘मी वसंतराव’ यांसारख्या लोकप्रिय आणि दर्जेदार सिनेमांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. नितीन बोरकर यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
काही दिवसांआधी प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या जर तर ची गोष्ट' या सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाचा दिग्दर्शक रणजित पाटिलचं निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी रणजित पाटिलने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूरमध्ये राहत्या घरी रणजितवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
