हे सर्व कॉर्ड सेट खादी आणि कॉटन या नैसर्गिक आणि आरामदायक कापडांमध्ये उपलब्ध आहेत. हे कपडे घालायला हलके आणि ट्रेंडी असल्यामुळे महिलांची विशेष पसंती मिळत आहे. रोजचा वापर, ऑफिस, कॉलेज, प्रवास किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हे कॉर्ड सेट अतिशय योग्य आहेत.
advertisement
या स्टॉलवर डिझाईन्स आणि रंगांची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. साधे, प्रिंटेड, फ्लोरल तसेच ट्रेंडी पॅटर्न्समधील कॉर्ड सेट येथे उपलब्ध आहेत. प्रत्येक वयोगटातील महिलांना आपल्या आवडीप्रमाणे ड्रेस निवडता येत असल्याने या ठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. दादर परिसरात 350 रुपयांत इतक्या मोठ्या साईजचे कॉर्ड सेट कुठेही मिळत नसल्याचे ग्राहक सांगतात. त्यामुळे प्लस साईज महिलांसाठी हा स्टॉल एक मोठा दिलासा ठरला आहे. अनेक महिला एकदा खरेदी केल्यानंतर पुन्हा येथे येताना दिसतात.
या स्टॉलवर किरकोळ विक्रीसोबतच होलसेलची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे बुटीक चालक, छोटे व्यापारी आणि ऑनलाइन विक्रेते मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. हा स्टॉल सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतो. दादर वेस्ट येथे सुविधा शोरूमच्या शेजारी आणि बर्गर किंगच्या खाली हा स्टॉल आहे. कमी किमतीत दर्जेदार, मोठ्या साईजचे आणि फॅशनेबल कॉर्ड सेट हवे असतील, तर या स्टॉलला नक्कीच भेट देण्यासारखे आहे.





