दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार', हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांना 'आरपार' आणि प्रिया बापट-उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' असे तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज झालेत. हे तिन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. एकाच दिवशी तीन सिनेमे रिलीज केल्याने ते चालतील की नाही याची शंका अनेकांना होती पण पहिल्या आठवड्याच्या कमाईचा आकडा पाहिला तर ही शंका काहीशी कमी होताना दिसत आहे.
advertisement
12 सप्टेंबरनंतर आता 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी देखील आणखी तीन मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. हे तिन्ही सिनेमे देखील वेगळ्या जॉनरचे आणि वेगळी कथा असलेले आहेत. पु्न्हा एकदा तीन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर राडा घालण्यासाठी सज्ज झाले आहेत.
'आतली बातमी फुटली' हा कॉमेडी क्राइम ड्रामा असलेला सिनेमा देखील 19 सप्टेंबरला रिलीज होतोय. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती फिरणारी कथा सिनेमात मांडण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
अरण्यक
'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. अभिनेत्री वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या सिनेमात आहे. कोकणातही धम्माल देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
जंगल, संघर्ष आणि नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी त्याचबरोबर सत्य घटनांनी प्रेरित असलेला 'अरण्य' हा सिनेमाही 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. संघर्षमय जीवनाची झुंज, नक्षलवादाने उद्ध्वस्त होत चाललेले आयुष्य, नात्यांमधील गुंतागुंत आणि जंगलातील धडकी भरवणारा वास्तव संघर्ष या ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
या सिनेमात अभिनेता हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.