TRENDING:

सूनसान हवेली, खून अन्... मराठीत कधीच पाहिला नाही असा सायकोलॉजिकल थ्रिलर, असंभवचा अंगावर काटे आणणारा टीझर रिलीज

Last Updated:

Asambhav Movie Teaser : काही दिवसांपूर्वी 'असंभव' या चित्रपटाच्या पोस्टर्सने मराठी प्रेक्षकांच्या मनात कुतूहलाचे बीज पेरले होते आणि आता त्याच कुतूहलाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा थरारक टीझर प्रदर्शित झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काही दिवसांपूर्वी 'असंभव' या चित्रपटाच्या पोस्टर्सने मराठी प्रेक्षकांच्या मनात कुतूहलाचे बीज पेरले होते आणि आता त्याच कुतूहलाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा थरारक टीझर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक सचित पाटील यांचा हा आगामी चित्रपट केवळ एक गोष्ट नसून, मानवी मनाला हादरवून टाकणारा रहस्यमय प्रवास असणार आहे, हे टीझरवरून स्पष्ट होते.
News18
News18
advertisement

नैनितालची ती गूढ हवेली आणि दुहेरी भूमिकेत मुक्ता?

'असंभव'चा टीझर पहिल्या फ्रेमपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. टीझरमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काहीतरी अघटित घडत असल्याचे दिसते. हवेलीतील गूढ शांतता, मुक्ताची घाबरलेली नजर आणि अचानक घडणाऱ्या घटनांमुळे थरार वाढला आहे. मुक्ता बर्वेची भूमिका दुहेरी आहे का, असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे.

अक्षय कुमार वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार नाही, फोडणार! 13 हजार कोटी कमाई करणाऱ्या हॉलिवूड फिल्मचा विक्रम मोडणार

advertisement

दुसरीकडे, अभिनेत्री प्रिया बापट देखील एका गूढ आणि काहीतरी लपवणाऱ्या भूमिकेत आहे, असे दिसते. हवेलीत खून झाला आहे, पण कोणाचा आणि का? दिग्दर्शक सचित पाटील स्वतः या गूढाचा शोध घेत आहेत आणि संदीप कुलकर्णी यांच्या भूमिकेचा या रहस्याशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न टीझरने उभे केले आहेत, ज्याची उत्तरे फक्त 'असंभव' पाहिल्यावर मिळणार आहेत.

advertisement

मराठीत 'सायकोलॉजिकल थ्रिलर'चा नवा प्रयोग

टीझरमधून स्पष्ट होते की 'असंभव' हा एक परिपूर्ण सायकोलॉजिकल थ्रिलर असून, तो भावना, थरार आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे. नैनितालसारख्या निसर्गरम्य ठिकाणी झालेले चित्रीकरण, कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि तांत्रिक बाजूंची भव्यता या सगळ्यामुळे हा चित्रपट एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, "या चित्रपटात आम्ही पारंपरिक रहस्यपटाच्या चौकटीतून बाहेर जाऊन काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पटकथा आणि दृश्यांची मांडणी इतकी गुंतवून ठेवणारी आहे की, तुम्ही शेवटपर्यंत 'गेस' करू शकणार नाही."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 'एरिकॉन टेलिफिल्म्स' आणि 'पी अँड पी एंटरटेनमेंट'च्या सहकार्याने मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटने तयार केला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
सूनसान हवेली, खून अन्... मराठीत कधीच पाहिला नाही असा सायकोलॉजिकल थ्रिलर, असंभवचा अंगावर काटे आणणारा टीझर रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल