अक्षय कुमार वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार नाही, फोडणार! 13 हजार कोटी कमाई करणाऱ्या हॉलिवूड फिल्मचा विक्रम मोडणार

Last Updated:

अक्षय कुमारचा चित्रपट जगभरात हजारो कोटी कमावलेल्या एका जबरदस्त हॉलिवूड चित्रपटाचा भारतातील रेकॉर्ड मोडू शकतो.

News18
News18
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या अफलातून केमिस्ट्रीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा चित्रपट 'जॉली एलएलबी ३' बॉक्स ऑफिसवर सध्या धीमी पण दमदार कमाई करत आहे. रिलीज होऊन २९ दिवस उलटले असले तरी, प्रेक्षक अजूनही हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटासमोर आता फक्त चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे आणि याच वेळेत तो जगभरात हजारो कोटी कमावलेल्या एका जबरदस्त हॉलिवूड चित्रपटाचा भारतातील रेकॉर्ड मोडू शकतो.

२१ ऑक्टोबरपूर्वी रेकॉर्ड मोडण्याची संधी!

२१ ऑक्टोबरला 'थामा' हा मोठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'जॉली एलएलबी ३' चे शो कमी होतील किंवा पूर्णपणे थांबवले जातील. त्यामुळे अक्षयच्या चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
advertisement
'जॉली एलएलबी ३' ने पहिल्या आठवड्यात ७४.०० कोटी, दुसऱ्या आठवड्यात ९.०० कोटी, तिसऱ्या आठवड्यात ७.३० कोटी, चौथ्या आठवड्यात ३.९० कोटी, तर २९ व्या दिवशी सायंकाळी ७.०५ वाजेपर्यंत ०.१४ कोटी कमावले. अशाप्रकारे या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई ११४.३४ कोटी झाली आहे.
advertisement

'अवेंजर्स एंडगेम'ला 'जॉली' देणार टक्कर!

'जॉली एलएलबी ३' ने नुकताच आमिर खानच्या 'गजनी' या चित्रपटाचा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आता त्याच्या समोर दोन बॉलिवूड चित्रपट आहेत, ते म्हणजे 'रा-वन' आणि 'बाला'. मात्र, या चित्रपटांनंतर एका अशा हॉलिवूड चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात आला आहे, ज्याने जगभरात तब्बल १३,३३५ कोटी रुपये कमावले होते.
advertisement
Sacnilk नुसार, 'अवेंजर्स एंडगेम'ची भारतातील एकूण कमाई ११६.४७ कोटी रुपये होती. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी 'जॉली एलएलबी ३' ला फक्त २ कोटी रुपयांची कमाई करण्याची गरज आहे. चित्रपट पाचव्या आठवड्यात दाखल झाला असून, वीकेंडमध्ये कमाई वाढण्याची मोठी शक्यता असल्याने, अक्षय कुमारच्या चित्रपटाकडून हा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला जाईल अशी आशा आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अक्षय कुमार वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार नाही, फोडणार! 13 हजार कोटी कमाई करणाऱ्या हॉलिवूड फिल्मचा विक्रम मोडणार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement