आईचा 50 वर्षे जुना व्यवसाय लेकीने सांभाळला, आता सगळेच करताय कौतुक
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
गेली 50 वर्षांपासून आईने सुरू केलेला स्टीलच्या वस्तूपासून ते लोखंडी प्लास्टिक पर्यंतच्या सर्व घरगुती वस्तू इथे मिळत असलेला हा व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी निर्मला यांनी आईला मोठा आधार दिला.
गेली 50 वर्षांपासून आईने सुरू केलेला स्टीलच्या वस्तूपासून ते लोखंडी प्लास्टिक पर्यंतच्या सर्व घरगुती वस्तू इथे मिळत असलेला हा व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी निर्मला यांनी आईला मोठा आधार दिला. आई एकटी असल्याने निर्मलाने आईसोबत हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्या आईने फिरता धंदा सुरू केला. हा धंदा जत्रा, मोठ मोठे कार्यक्रम किंवा सार्वजनिक सप्ताह अशा ठिकाणी त्या आपला व्यवसाय गेली 50 वर्षांपासून उभा करत आहेत. त्यांच्या या व्यवसायातून त्या दोघी समाधानी असल्याचे निर्मला यांनी सांगितले.
आम्हाला कोणाचे नोकर व्हायला आवडत नाही, कष्टाने उभ राहायचं आणि स्वाभिमनात जगायच असा निर्मलाच्या आईचा स्वभाव आज त्याच पावलांवर पाऊल ठेवून पुढे चालायचं असं निर्मलाने ठरवल्याने त्यांचा हा धंदा सण उत्सव नसतील तेव्हा कायम कल्याणच्या dcp ऑफिस समोर रस्त्यावर हे भांडी दुकान आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही मायलेकी या व्यवसायात पूर्णपणे वाहून घेत असल्याने येणारा ग्राहकांचा समाधान त्यांना हव्या असलेल्या वस्तूची पूर्तता करून त्यांच्या चेहऱ्यावर येणारा समाधान हाच त्यांना पुढे उभ राहायचं बळ देत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवसायातून फायदा फार जास्त होत नाही पण खाऊन पिऊन सुखी आहोत.
advertisement
लोकांच्या मुख्य म्हणजे आमच्या या व्यवसायातून कोणाचा तरी संसार उभा राहतो. गृहिणी येते ती घरात ही वस्तू हवी ती वस्तू अस करून खूप काही कमीत कमी बजेट मध्ये घेऊन जातात. त्यामुळे त्यांना मिळणारा आनंद आम्हाला खूप समाधान देऊन जात. हा व्यवसाय किंवा धंदा म्हणावं एवढा काळ टिकून राहणं खूप कठीण होत त्या काळात निर्मला यांच्या आईने खूप लोकांचा रस्त्यावर धंदा करण्यास त्यात फिरता धंदा करण्यास नकार असल्याने अनेकांना एकटीने तोंड दिला. आज निर्मलाच्या आईची स्त्री शक्ती निर्मलाच्या चेहऱ्यावर बघायला मिळते. समाज ज्या व्यवसायाला विरोध करत होता आज त्याच व्यवसायातून निर्मलाच्या आईने लोकांचे संसार भाड्यांनी भरले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 17, 2025 9:31 PM IST