2 मुलं अन् सोन्यासारखा संसार, 'धुरंधर'च्या आई-वडिलांमध्ये नेमकं काय बिनसलं! का दिला गीतांजलीने विनोद खन्नांना डिवोर्स?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vinod Khanna - Geetanjali Divorce : अक्षय खन्ना 'धुरंधर'मुळे चर्चेत आहे. वडील विनोद खन्ना यांनी गीतांजली तलेयारखानशी लग्न केलं, ओशोमुळे विभक्त झाले. विनोद खन्ना नंतर कविता दफ्तरीशी विवाह केला.
अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आहे. 'धुरंधर'मधील त्याचं एन्ट्रीचं गाणं आणि डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यानिमित्तानं अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अक्षय खन्नाचे वडील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याही वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे.
advertisement
advertisement
advertisement
कॉलेजमध्ये असताना गीतांजली आणि विनोद खन्ना यांची पहिली भेट झाली. गीतांजलीला विनोद पहिल्याच नजरेत आवडले होते. दोघांनी एकत्र एक्टिंग सुरू केली. पुढे जाऊन विनोद खन्ना यांना सिनेमे मिळू लागले त्यांची प्रसिद्धी वाढली. 1971 साली विनोद खन्ना यांनी गीतांजलीबरोबर लग्न केलं. एक वर्षांनी त्यांला राहुल खन्ना हा मुलगा झाला आणि 1975 साली अक्षय खन्ना झाला. विनोद खन्ना कुटुंबाच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होते. रविवारी सुट्टी घेऊन ते संपूर्ण वेळ कुटुंबाला द्यायचे.
advertisement
advertisement
अमेरिकेला गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात विनोद खन्ना फोन करून पत्नी आणि मुलांच्या संपर्कात होते. पण दिवसेंदिवस त्यांच्यातील अंतर हे वाढत गेलं. दोन्ही मुलं मोठी होत होती. त्या काळात गीतांजली दोन्ही मुलांची आई आणि बाबा बनली. दैनंदिन आयुष्यात वडिलांशिवाय जगताना मुलांना वारंवार प्रश्नांचा सामना करावा लागला.
advertisement
जवळपास तीन वर्षा गीतांजली यांनी मुलांना एकट्यानं सांभाळलं. या काळात त्यांनी विनोद खन्ना यांनी पुन्हा घरी परतण्यासाठी खूप मनवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर त्यांनी अल्टीमेटम दिला. कुटुंब किंवा अध्यात्मिक मार्ग या दोघांपैकी एकाची निवड करावी लागले असं थेट सांगितलं. पण यावरही विनोद खन्ना यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर गीतांजली यांनी 1985 साली निवोद खन्ना यांनी डिवोर्स पाठवली आणि दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले.
advertisement
advertisement










