Kalyan News : कल्याण स्टेशनचा 'तो' भाग बनतोय गुन्हेगारांचा अड्डा; महिलांना प्रवास करताना जीवाची भीती

Last Updated:

kalyan Station Area : कल्याण स्थानकाचा एक भाग आता गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला आहे. महिलांना प्रवास करताना सुरक्षिततेची भीती वाटत राहते.

News18
News18
कल्याण : सध्या कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम सुरु आहेत. स्टेशन परिसरातील या कामांमुळे रोज वाहतूककोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या सर्वांमुळे नागरिकांना अजून काही गोष्टींचा सामना करावा लागत असून महिलांनही याचा त्रास होत आहे. नेमकं काय घडतं आहे कल्याण स्टेशन परिसरात जाणून घेऊयात.
कल्याण स्टेशनचा तो भाग महिलांसाठी असुरक्षित
स्थानकाच्या परिसरात होणाऱ्या कामामुळे अनेक फेरीवाले आपली दुकाने स्कायवॉकवर लावत आहेत. आधीच स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्यात स्कायवॉकवर फेरीवाल्यांची उपस्थिती प्रवाशांना ये-जा करताना अतिरिक्त अडथळा निर्माण करत आहे. नागरिकांना असा प्रश्न पडतो की हा स्कायवॉक प्रवाशांसाठी आहे की फेरीवाल्यांसाठी?
गर्दीतून मार्ग काढताना विशेषतहा महिलांना अधिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा स्कायवॉकवर महिलांची छेड काढण्याचेही प्रकार गर्दीत होत आहेत त्यामुळे महिलांनी दिवसाही जीव धोक्यात घोलून प्रवास करावा लागत आहे,त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे यंत्रणेला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी फेरीवाल्यांनी निर्धारित जागेवरच व्यवसाय करावा आणि प्रवाशांसाठी मार्ग मोकळा ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
advertisement
स्थानक परिसरातील या परिस्थितीवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा येथील गर्दी आणि अडथळे दिवसेंदिवस वाढत राहतील. नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची हमी देणे प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याण स्टेशनचा 'तो' भाग बनतोय गुन्हेगारांचा अड्डा; महिलांना प्रवास करताना जीवाची भीती
Next Article
advertisement
Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement