माजघरमध्ये शाही सजावट
नुकतेच 'लक्ष्मी निवास' मालिकेच्या संपूर्ण टीमने लोकप्रिय 'माजघर' नावाच्या पारंपरिक रेस्टॉरंटमध्ये मेघन आणि अनुष्काचे पहिले केळवण अत्यंत थाटामाटात आयोजित केले. या समारंभासाठी हॉटेलमध्ये खास केळवण स्पेशल शाही सजावट करण्यात आली होती. मेघन आणि अनुष्काचे औक्षण करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. केळीच्या पानावर 'मेघन अनुष्काचे केळवण' असे सुंदर अक्षरात लिहिलेले होते, ज्यामुळे या सोहळ्याला खास पारंपरिक टच मिळाला होता.
advertisement
या खास क्षणी हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, दिव्या पुगांवकर, मिनाक्षी राठोड यांसारखी 'लक्ष्मी निवास' मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. जयंतने स्वतः अनुष्काची टीमसोबत औपचारिक ओळख करून दिली. केळवण समारंभात मेघन जाधवने होणाऱ्या पत्नीला पहिला घास भरवताना घेतलेला बॉलीवूड स्टाईल उखाणा उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला.
मेघनने उखाणा घेत म्हटलं, “अनुष्काचे नाव घेतो… तूच माझी मस्तानी आणि तूच माझी काशी!” मेघनचा हा हटके उखाणा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच जोरदार जल्लोष केला. अनुष्का पिंपुटकरही मेघनच्या उखाण्याने थक्क झाली. तिने 'ओह माय गॉड' अशी प्रतिक्रिया देत मेघनचे कौतुक केले.
मेघन-अनुष्काच्या लव्हस्टोरीवर खास गाणं
या केळवण समारंभाचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे व्हिडिओच्या बॅकग्राउंडला गाण्याच्या स्वरूपात मेघन आणि अनुष्काची लव्हस्टोरी ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर चाहत्यांकडून या जोडीला खूप शुभेच्छा मिळत आहेत.
