आध्यात्माकडे होता लहानपणापासूनच ओढा
7 ऑक्टोबर 1977 रोजी जन्मलेल्या युक्ता मुखी हिचं असं मत आहे की कदाचित ती फिल्म इंडस्ट्रीसाठी बनलेली नव्हती. ती म्हणते की, जेव्हा कोणी नवखं असतं, तेव्हा त्या सहकार्याची अपेक्षा असते. पण तिच्या बाबतीत तसं झालं नाही. युक्ता अभिमानाने सांगते की,"मी तीन फ्लॉप चित्रपट केले आणि या गोष्टीची मला अजिबात लाज वाटत नाही". युक्ताला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. ती सांगते की, ती लहान असताना आपल्या आजीसोबत सत्संग, कीर्तनाला वगैरे जायची. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने एका आध्यात्मिक गुरुंची भेट घेतली. ज्यांचं आश्रम मुंबईजवळ गणेशपुरी येथे होतं. आश्रमाचं शिस्तबद्ध वातावरण आणि सर्वांशी समान वागणूक तिला फार आवडली.
advertisement
वा दादा वा... मुख्यमंत्री फडणवीसही प्राजक्ता माळीचे फॅन! म्हणाले, 'त्यांच्याशिवाय दुसरं कुणी...'
मॉडेलिंगचा प्रवास कसा सुरू झाला?
शाळा आणि कॉलेजमध्ये असताना युक्ता नियमितपणे आश्रमात जायची. याच काळात तिने वादविवाद स्पर्धा आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेणं सुरू केलं. तिच्या उंची आणि व्यक्तिमत्त्वामुळे मित्र-मैत्रिणींनी तिला 'मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला आणि इथून खऱ्या अर्थाने तिच्या सौंदर्य स्पर्धेच्या प्रवासाला सुरुवात झाली. युक्ताने मिस इंडिया जिंकल्यानंतर मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला आणि थेट किताबच जिंकला. हा क्षण तिच्या आयुष्यात सर्वात अभिमानास्पद ठरला. पण, बॉलिवूडमधील प्रवास मात्र यशस्वी ठरला नाही. तिने 2002 मध्ये ‘प्यासा’ या चित्रपटातून पदार्पण केलं. पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर तिने हळूहळू फिल्म इंडस्ट्रीपासून दूर व्हायचं ठरवलं.
आता काय करतेय युक्ता मुखी?
युक्ताचं आयुष्य केवळ ग्लॅमरपुरतंच मर्यादित नव्हतं. तिचा कौटुंबिक इतिहासही खूप प्रेरणादायक आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, भारत-पाक फाळणीच्या वेळी तिचे वडील फक्त 3-4 वर्षांचे होते आणि कसंबसं प्राण वाचवत त्यांनी भारतात आश्रय घेतला. तिच्या कुटुंबाने शरणार्थी छावणीत जीवन व्यतीत केलं. ती म्हणते, “माझं गाव विचारलंत तर मी म्हणेन, माझं गाव नाही. मी मुंबईतून आहे, आणि मला याचा अभिमान आहे.” 2008 मध्ये तिने न्यूयॉर्कमधील बिझनेसमन प्रिन्स तुलीशी लग्न केलं. पण हे फार काळ त्यांचं लग्न टिकलं नाही. तिने पतीवर गंभीर आरोप करत घटस्फोट घेतला. आज युक्ता आपल्या मुलाच्या संगोपनात आणि आध्यात्मिक जीवनात आपला वेळ घालवते. चित्रपटांचा झगमगाट मागे टाकून तिने स्वतःसाठी एक वेगळं, शांततामय जीवन निवडलं आहे.