वा दादा वा... मुख्यमंत्री फडणवीसही प्राजक्ता माळीचे फॅन! म्हणाले, 'त्यांच्याशिवाय दुसरं कुणी...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Mali Wah Dada Wah : 'वा दादा वा' आणि प्राजक्ताचं एक वेगळं समीकरण झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्राजक्ताच्या 'वा दादा वा'चे फॅन आहेत.
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमासाठी तिचं अनेक पुरस्कारांनी कौतुक करण्यात आलं. 'फुलवंती' सिनेमाची ती मुख्य अभिनेत्री होतीच पण ती या सिनेमाची निर्मातीही होती. प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अँकरींगसाठीही ओळखली जाते. 'वा दादा वा' आणि प्राजक्ताचं एक वेगळं समीकरण झालं आहे. तिच्या या 'वा दादा वा' वरून लोक तिला ओळखतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्राजक्ताच्या 'वा दादा वा'चे फॅन आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तास या वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी प्रत्येक पुरस्कार विजेत्यांचे नाव घेऊन त्यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिनेत्री प्राजक्ती माळी हिचाही उल्लेख करून हास्यजत्रेतील गाजलेली 'वाह दादा वाह' चे फॅन असल्याचे सांगितलं.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आजच्या कार्यक्रमाला अनेक जण आले आहेत. प्राजक्ता माळी त्यांनी फार सुंदर अशा प्रकारचा अभिनय केला आहे. मगाशी मी बसलो होतो माझं लक्ष नव्हतं की प्राजक्ता तिथे बसल्या आहेत. पण अचानक 'वा दादा वा' ऐकायला आले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्राजक्ताशिवाय दुसरं कुणी असू शकत नाही."
advertisement
मुख्यमंत्र्यांनी केलेलं कौतुक पाहून प्राजक्ता माळी देखील खुश झाली. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वा दादा वा' या हाइटवर पोहोचलं आहे हे माहिती नव्हतं.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, फुलवंती सिनेमानंतर प्राजक्ता पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये पतरली आहे. प्राजक्ताचे आगामी प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. तर दुसरीकडे प्राजक्ता माळी तिच्या बिझनेसमध्येही प्रगती करताना दिसतेय. तिच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडचं सर्वत्र कौतुक होतंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 9:28 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वा दादा वा... मुख्यमंत्री फडणवीसही प्राजक्ता माळीचे फॅन! म्हणाले, 'त्यांच्याशिवाय दुसरं कुणी...'