Horror Web Series : ओटीटीवर अनेक असे चित्रपट आणि सीरीज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये खऱ्या भयावह सत्यकथा दाखवण्यात आल्या आहेत. हॉररप्रेमी मोठ्या प्रमाणात या वेब सीरिजला पसंती दर्शवताना दिसत आहेत. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, झी 5 अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अशा हॉरर सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. अलीकडेच ओटीटीवर अशीच एक नवीन सीरीज आली आहे, जी रिलीज होताच ओटीटीचे प्रेक्षक आणि हॉरर प्रेमींमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. या सीरिजमध्ये दोन खरीखुरी भयावह प्रकरणं दाखवण्यात आली आहेत. या सीरिजची निर्मिती हॉरर मास्टर जेम्स वॉन यांनी केली आहे. ओटीटीवर सर्वाधिक ट्रेंडिंग असणाऱ्या या सीरिजमध्ये दोन केस आहेत Eerie Hall आणि This House Murdered Me. पहिल्या केसमध्ये, 1984 साली एका कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या अघटित आणि भूताटकी घटनांचं चित्रण आहे. तर दुसऱ्या केसमध्ये एका कुटुंबाच्या नव्या घरात घडलेल्या भयावह घटनांबद्दल सांगण्यात आलं आहे.
advertisement
ज्यांनी स्वतः हे भीतीदायक अनुभव घेतले आहेत आणि आजही त्या घटनांमधून सावरायचा प्रयत्न करत आहेत, अशा पीडितांच्या मुलाखती या हॉरर सीरिजमध्ये दाखविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कहाण्या सिनेमॅटिक रीक्रिएशनच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या आहेत. या सीरिजचं नाव आहे ‘True Haunting’. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 ऑक्टोबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज झाली आहे आणि लगेचच ट्रेंडिंगमध्ये आली. या सीरिजचे दिग्दर्शक आहेत नील रॉल्स आणि ल्यूक वॉटसन. Eerie Hall चे तीन भाग आहेत आणि This House Murdered Me चे दोन भाग. प्रत्येक भाग सुमारे 34 ते 39 मिनिटांचा आहे.
Big Breaking : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलीस ऑफिसर असलेल्या भावाला अटक
‘True Haunting’ या सीरीजमध्ये खऱ्या पीडितांसोबत कलाकारांचाही समावेश आहे. वायट डोरियन, लिज रॉकवेल चार्ट्रेंड, राइज अलेक्झेंडर फिलिप्स, मकेना पिकर्सगिल आणि कूपर लेवी यांनी त्या घटनांचे नाट्यमय रीक्रिएशन केलं आहे.
Raw TV आणि Atomic Monster यांनी एकत्रितपणे या सिरीजचं निर्मितीकार्य केलं आहे. याची सिनेमॅटोग्राफी आणि साउंड डिझाईन यामुळे ती एखाद्या फीचर फिल्मसारखी अनुभवली जाते. ‘True Haunting’ ला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. Heaven of Horror ही नेटफ्लिक्सवरील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट हॉरर डॉक्यूड्रामा ठरली आहे. तर Rotten Tomatoes ने तिला 2.5 रेटिंग दिलं आहे.
एकट्याने पाहण्याचं अजिबातच करू नका धाडस
एक विशेष बाब म्हणजे, तुम्ही ही सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर सहज पाहू शकता. याचा अधिकृत हिंदी ट्रेलर YouTube वर उपलब्ध आहे आणि सर्व एपिसोड्स हिंदी ऑडिओमध्ये पाहता येतात. भारतात ही सीरीज हिंदीमध्ये सहज स्ट्रीम करता येते. ही सिरीज TV-MA रेटिंगसह आली आहे, म्हणजे ती फक्त प्रौढ प्रेक्षकांसाठी आहे. भीती आणि रहस्य यांचं एक परिपूर्ण मिश्रण असणारी ही सीरिज आहे. तुम्ही एकट्यात ही सीरिज अजिबात पाहू शकता. खऱ्या घटनांवर आधारित या कथा तुम्हाला रोमांच आणि रहस्याने भरलेला अनुभव देतील.
