Big Breaking : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलीस ऑफिसर असलेल्या भावाला अटक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Zubeen Garg death case : झुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. झुबिनच्या पोलीस ऑफिसर भावालाच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलंय.
मुंबई : आसामचा प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. गायकाचा चुलत भाऊ, आसाम पोलीस सेवेत अधिकारी असलेल्या संदीपन गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. स्वतः एक पोलीस अधिकारी असलेले गर्ग सध्या बोको जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (प्रभारी) म्हणून काम करतात. झुबिन गर्ग यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक मोठं पाऊल उचललं आहे.
गायक झुबिन गर्ग यांचं 19 सप्टेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये अचानक निधन झालं. ते म्युझिक इव्हेंटसाठी सिंगापूरला गेले होते. त्यांचे चुलत भाऊ संदीपन गर्ग हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीही काही लोकांना अटक केली आहेत.
advertisement
झुबिन गर्ग यांच्या चुलत भावाला अटक
क्रिमनील इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (सीआयडी) झुबिन गर्ग प्रकरणाची चौकशी करत आहे. संदीपन गर्ग यांच्या आधीही गायकाच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे आणि काहींना ताब्यातही घेण्यात आले आहे.
झुबिन गर्गची पत्नी गरिमा सैकिया यांनी अलीकडेच त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये गरिमा आणि जुबीन यांची बहिण पाल्मे बोरठाकूर यांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय होतं की, "आपण लवकरच पुन्हा एकत्र येऊ, गोल्डी (हे नाव झुबिनला त्याच्या कुटुंबाने दिले होते). पण आता, लवकरच, मला/आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचे आहे की तू आमच्यापासून का दूर गेलास... का? हा एक मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न माझ्या मनात दिवसरात्र घुमत राहतो. मला उत्तरे हवी आहेत."
advertisement
विषबाधाचे आरोप
झुबिन गर्गचा बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी यांनी अलीकडेच गंभीर आरोप केले आहेत की गायकाचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि ऑरगनायझर श्यामकानु महंत यांनी त्याला विष देऊन मारले. त्यांनी या कृत्यासाठी जाणूनबुजून परदेशी ठिकाण निवडले. त्यांनी सर्व काही कटाचा भाग म्हणून केले. खून आणि गुन्हेगारी कट यासारखे गंभीर आरोप करत मॅनेजरवर आधीच FIR दाखल करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Big Breaking : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! पोलीस ऑफिसर असलेल्या भावाला अटक