HDFC Bank Loan: घर-कार बिनधास्त खरेदी करा! HDFC बँकेकडून ग्राहकांना खास गिफ्ट, दिवाळीआधी स्वस्त होणार लोन

Last Updated:
एचडीएफसी बँकेने MCLR दरात 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली असून 7 ऑक्टोबर 2025 पासून लागू आहे. गृह कर्ज, कार कर्ज, पसर्नल लोन EMI कमी होणार आहे.
1/7
सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने दिवाळीच्या तोंडावर आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला. बँकेने कर्जाच्या व्याजदरांमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली. एचडीएफसी बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये थेट 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली.

advertisement
2/7
बँकेने उचललेल्या या सकारात्मक पावलामुळे कर्ज घेतलेल्या लाखो ग्राहकांना थेट फायदा मिळणार आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. ज्यांनी या बँकेतून लोन घेतलं किंवा घेण्याचा विचार करत आहेत त्यांना फायदा होणार आहे.

3/7
MCLR म्हणजे कर्जाचा किमान व्याजदर असतो. बँकेला कोणत्याही ग्राहकाला या दरापेक्षा कमी दरात कर्ज देता येत नाही. त्यामुळे बँक जेव्हा MCLR मध्ये कपात करते, तेव्हा आपोआप कर्जाचे व्याजदरही कमी होतात.

4/7
 एचडीएफसी बँकेने केलेल्या या कपातीमुळे ज्या ग्राहकांनी गृह कर्ज, कार कर्ज किंवा पसर्नल लोन घेतले आहे, त्यांची मासिक हप्ता EMI कमी होण्यास किंवा कर्जाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. बँकेने ओव्हरनाइटपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या विविध मुदतींसाठीच्या MCLR मध्ये बदल केले आहेत. ही कपात 0.05 टक्क्यांपासून ते 0.15 टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे.

5/7
उदाहरणार्थ, बँकेचा ओव्हरनाइट MCLR दर 8.55 टक्क्यांवरून 8.45 टक्क्यांवर आला आहे, तर तीन महिन्यांचा MCLR 8.60 टक्क्यांवरून 8.45 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ही नवीन कपात 7 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाली आहे.

6/7
बँकेने MCLR मध्ये बदल केल्यास त्याचा परिणाम विशेषतः फ्लोटिंग दरांशी जोडलेल्या कर्जांवर होतो. जेव्हा बँक MCLR वाढवते, तेव्हा व्याजदर वाढून तुमचा EMI किंवा कर्जाचा कालावधी वाढतो. याउलट, MCLR मध्ये कपात झाल्यास, तुमचा EMI कमी होतो, ज्यामुळे तुमच्यावरील आर्थिक ताण कमी होतो. यामुळे एचडीएफसी बँकेच्या लाखो कर्जदारांना मोठा फायदा मिळणार आहे.

7/7
MCLR कसा निश्चित होतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. बँक आपल्या ठेवींवरील व्याजदर, रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट, बँकेचा कामकाजाचा खर्च आणि सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) या घटकांचा आधार घेऊन आपला MCLR ठरवते. त्यामुळे रिझर्व्ह बँक (RBI) जेव्हा रेपो रेटमध्ये बदल करते, तेव्हा त्याचा थेट परिणाम बँकांच्या MCLR दरावर होतो आणि त्यानुसार कर्ज महाग किंवा स्वस्त होते.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement