'मुन्ना भाई 3'वर काम करतायत राज कुमार हिरानी
अरशद पुढे म्हणाला,“मी संजूलाच सांगायचो की काल आपण हा सीन केला आणि आज आपण हा सीन करणार आहोत.” ‘मुन्ना भाई 3’ बाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत अरशद म्हणाला,“आधी ‘मुन्ना भाई 3’ बाबत काहीही घडामोड घडत नव्हती. पण आता राजकुमार हिरानी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम करत आहेत. ते यावर खूप मेहनत घेत आहेत".
advertisement
'त्याने ओठांवर ओठ ठेवत शर्ट...'; बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचची शिकार, सांगितला भयंकर अनुभव
अरशद म्हणाला,"मला असं वाटतंय की आता 'मुन्ना भाई 3' हा चित्रपट नक्कीच बनला पाहिजे.” गेल्या वर्षी हिरानी यांनीही सांगितलं होतं की त्यांच्या कडे एक आयडिया आहे आणि ते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम करत आहेत. हे सांगणं आवश्यक आहे की ‘मुन्ना भाई M.B.B.S.’ हा राजकुमार हिरानींचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर राजकुमार हिरानी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
बॉलिवूडमध्ये हिट चित्रपटांच्या सीक्वलचा ट्रेंड
बॉलिवूडमध्ये सध्या हिट चित्रपटाच्या सीक्वलचा ट्रेंड सुरू आहे. 'गदर 2'च्या यशानंतर अनेक जु्न्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. यात बॉर्डर 2, हेरा फेरी 3, वेलकम टू द जंगल (वेलकम 3), नो एन्ट्री 2 आणि 'मुन्ना भाई 3' या चित्रपटांचा समावेश आहे.
