'त्याने ओठांवर ओठ ठेवत शर्ट...'; बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचची शिकार, सांगितला भयंकर अनुभव
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress Casting Couch : बॉलिवूड अभिनेत्री नुकतंच कास्टिंग काऊचची शिकार झाल्याचा भीतीदायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कास्टिंग दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केले होते.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आजवर कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. अशातच नुकतंच एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबाबतचा तिचा भीतीदायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. कास्टिंग दिग्दर्शकाने अभिनेत्रीला कारमध्ये बसवून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डॉली सिंह पुढे म्हणाली,"जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्हाला बोलावं लागतं. नाहीतर समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्हाला कामात रस नाही. एक स्त्री म्हणून जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला काही ऑफर देतो, तेव्हा ते खूप गोंधळात टाकणारं असतं. तुम्ही समजू शकत नाही की तो तुमच्या टॅलेंटसाठी बोलतोय की तुमच्यासोबत बोलण्यामागे त्याचा काही दुसरा हेतू आहे".
advertisement
कास्टिंग काऊचबाबत बोलताना डॉली म्हणाली,"माझ्या संपर्कात आलेला कास्टिंग दिग्दर्शक मला फोन करायचा. ऑडिशनबाबतीत बोलायचा. मला म्हणायचा की, एका निर्मात्याला तो मला भेटवणार असल्याचंही सांगायचा. त्यासाठी त्याने मला दिल्लीत एका 5-स्टार हॉटेलमध्ये बोलावलं होतं. निर्मात्यासोबत मीटिंग झाल्यानंतर मी त्या कास्टिंग दिग्दर्शकाच्या गाडीत बसले. आम्ही निर्मात्याची परत येण्याची वाट पाहत होते. तेव्हा अचानक त्या कास्टिंग दिग्दर्शकाने माझ्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि माझं शर्ट काढायला सुरुवात केली. त्यावेळी मी हैराण झाले होते. काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं".
advertisement
डॉली कास्टिंग काऊचची शिकार झाली त्यावेळी तिचं वय 19 होतं. तर कास्टिंग दिग्दर्शक सुमारे 35 ते 40 वर्षांचा होता. डॉली म्हणाली,"त्यावेळी मी त्या कास्टिंग दिग्दर्शकाला दूर ढकललं पण काही बोलू शकले नाही. ना पळून जाऊ शकले. त्यावेळी मी फक्त त्या माणसापासून माझी लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते".


