Amitabh Bachchan : 'जग बदलतं, माणसं बदलतात'; रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांची क्रिप्टिक पोस्ट; चाहते पुन्हा संभ्रमात
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan Cryptic Post : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री 12 वाजता आपल्या ब्लॉगमध्ये एक क्रिप्टिक पोस्ट लिहिली असून त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज वयाच्या 83 व्या वर्षीही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या मनातील भावना ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नुकतंच रात्री 12 वाजता ब्लॉगमध्ये त्यांनी एक क्रिप्टिक पोस्ट लिहिली असून त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
बिग बींनी लिहिलं आहे,"तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला, वो जो हम पर जुमले कसते है, हमें जिंदा तो समझते हैं". अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं आहे,"समय बदलता है... दुनिया बदलती है...रवैया, आदतें बदलती हैं...संस्कृती बदलती है...लोग बदल जाते हैं...जो लोग 'तब',थे वे अब नहीं हैं...और जल्ह ही जो लोग 'अब' हैं, वे 'तब'के संदर्भ बन जाएंगे".
advertisement
advertisement
advertisement


