निधी अग्रवाल अलीकडेच हैदराबादमध्ये तिच्या गाण्याच्या लाँचिंग एव्हेंटसाठी गेली होती. जाताना ती व्यवस्थित गेली मात्र बाहेर पडताना तिच्या नाकीनऊ आले. निधी अग्रवालला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. अभिनेत्रीला पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये प्रचंड बेशिस्त पाहायला मिळाली. लोकांनी तिला चारही बाजूंनी घेरलं. त्या गर्दीत तिला तिचा ड्रेसही सांभाळणंही कठीण झालं. तिच्या बाऊसर्सनी तिला कसंबसं तिच्या कारमध्ये बसवलं. कारमध्ये बसल्यानंतर निधीने सुटकेचा श्वास सोडला. हा सगळा जमाव पाहून ती शॉक झाली.
advertisement
( 'महाभारत'मधील तो सीन करताना ढसाढसा रडली अभिनेत्री, स्वत:ला केलेलं खोलीत बंद, असं काय घडलेलं? )
निधी अग्रवाल 'द राजा साहेब' या सिनेमात अभिनेता प्रभासबरोबर दिसणार आहे. या सिनेमातील 'सहाना सहाना' हे गाणं नुकतंच रिलीज झालं. या गाण्याचा लाँचिंग एव्हेंट हैद्राबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिथे तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. गर्दीतून बाहेर पडतनाचा निधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांना तिला यासाठी ट्रोलही केलं आहे. एका युजरने लिहिले, "'दराजासाब'च्या गाण्याच्या लाँचवेळी निधीला असे पाहून माझा श्वासच गेला." दुसऱ्याने लिहिले, "हे फॅन्डम नाही..."
इतक्या गर्दीत तिच्यासोबत काहीही घडू शकलं असतं पण याप्रसंगी कोणीही माणुसकी दाखवली नाही. गर्दीत तिचे कपडे सांभाळत ती कशीबाशी कारपर्यंत पोहोचली, असं म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे.
अभिनेत्री निधी अग्रवालने 2017 साली टायगर श्रॉफसोबत 'मुन्ना मायकल' या सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर ती 'साव्यासाची', 'मिस्टर मजनू' आणि 'हरी हरा वीरा मल्लू' सारख्या सिनेमांमध्ये दिसली. ती लवकरच हॉरर कॉमेडी 'द राजा साब' मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 9 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
