नशेत असलेल्या व्यक्तीने नोरा फतेहीच्या दिली धडक
नशेत असलेल्या एका व्यक्तीने नोराच्या कारला धडक दिल्यानंतर तिची टीम त्वरित तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. या रस्ता अपघातात अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र नोराने कामावर परतण्याचा आग्रह धरला आणि सनबर्न 2025 साठी रवाना झाली.
advertisement
अभिनेत्रीचं सीटी स्कॅन
नोरा फतेहीला अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी काही अंतर्गत दुखापत झाली आहे का हे तपासण्यासाठी सीटी स्कॅन केला. सीटी स्कॅननंतर डॉक्टरांनी सांगितले की तिला गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे अभिनेत्रीने आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आज ती डेव्हिड गुएटा यांच्या शोमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहे.
डेव्हिड गुएटा यांचा शो
डेव्हिड गुएटा आपल्या अत्यंत लोकप्रिय ‘मोनोलिथ शो’सह 20 डिसेंबर रोजी भारतात आले आहेत. आठ वर्षांनंतर ते भारतात आले आहेत. याआधी ते 2017 मध्ये भारतात आले होते. त्यामुळे या शोबाबत आंतरराष्ट्रीय स्टारच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यातच नोरा फतेहीच्या विशेष परफॉर्मन्समुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
