TRENDING:

मर्सिडीज सोडून थेट टॅक्सी! स्वस्त कारमधून फिरताना दिसला बॉलिवूडचा सुपरस्टार, अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते शॉक

Last Updated:

Govinda: उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर गोविंदाला एका साध्या हुंडई ऑरा टॅक्सीतून प्रवास करताना पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ९० च्या दशकात ज्याच्या एका ठुमक्यावर थिएटमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडायचा, ज्याची एक झलक पाहण्यासाठी आलिशान गाड्यांचा ताफा कमी पडायचा, तो सर्वांचा लाडका गोविंदा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. पण यावेळी कारण कोणताही चित्रपट किंवा डान्स नसून, त्याचा एका साध्या टॅक्सीमधील प्रवास आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर गोविंदाला एका साध्या हुंडई ऑरा टॅक्सीतून प्रवास करताना पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून, सुपरस्टारच्या सध्याच्या परिस्थितीवर सोशल मीडिया दोन गटात विभागला गेला आहे.
News18
News18
advertisement

लग्झरी गाड्या सोडून टॅक्सीत, नेमकं प्रकरण काय?

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये गोविंदा 'भारत सरकार' असं लिहिलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या टॅक्सीत आरामात बसलेले दिसत आहेत. कधीकाळी मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूच्या ताफ्यात फिरणाऱ्या हिरोला अशा साध्या गाडीत पाहून फॅन्स शॉक झाले. काहींनी याला त्यांच्या करिअरची घसरण म्हटलं, तर काहींनी याला गोविंदाचा साधेपणा असं नाव दिलं. मात्र, गोविंदा नक्की तिथे कशासाठी गेला होता आणि टॅक्सीने का फिरत होता, याचं गुपित अद्याप गुलदस्त्यातच आहे.

advertisement

प्रतापगडमध्ये आजही गोविंदाचीच हवा

गोविंदा जरी सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असला, तरी लोकांच्या मनातून ता आजही उतरलेला नाहीत. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील दोन शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला त्याने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. संगम इंटरनॅशनल स्कूलच्या मंचावर जेव्हा गोविंदाने आपल्या सिग्नेचर स्टेपमध्ये ‘मैं तो रास्ते से जा रहा था’ गाण्यावर ठेका धरला, तेव्हा उपस्थित हजारो चाहत्यांनी जल्लोष केला.

advertisement

गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत्या. या सगळ्यावर मौन सोडताना गोविंदाने रोखठोक उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, "जेव्हा तुमच्याकडे प्रसिद्धी आणि पैसा येतो, तेव्हा त्यासोबत षडयंत्र मोफत येतात. अनेक लोक माझ्या शांत राहण्याला माझी कमजोरी समजत होते, पण आता उत्तर देण्याची वेळ आली आहे." आपल्या विरोधात काही लोक मुद्दाम अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्याने केला.

advertisement

गोविंदाला काम मिळत नाही की ऑफर्स नाकारल्या?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याच्या चर्चांवर गोविंदाने स्पष्ट केलं की, आजही त्याच्याकडे अनेक ऑफर्स येतात, पण त्यांनी स्वतःहून त्या नाकारल्या आहेत. "आजच्या मार्केटमध्ये माझ्या सिनेमासाठी जी जागा हवी, ती कदाचित सध्या नाहीये, पण मला त्याचं दुःख नाही. मी सध्या अध्यात्मिक प्रवासात आणि माझ्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे," असं म्हणत त्याने ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
मर्सिडीज सोडून थेट टॅक्सी! स्वस्त कारमधून फिरताना दिसला बॉलिवूडचा सुपरस्टार, अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते शॉक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल