ओटीटीवरील या बहुप्रतीक्षित हॉरर सीरिजचं नाव 'भय –द गौरव तिवारी मिस्ट्री' असं आहे. एकूण आठ एपिसोडची ही सीरिज आहे. रॉबी ग्रेवाल यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये गौरव तिवारी यांच्या भूमिकेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण टॅकर साकारत आहे. या मालिकेचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना करण म्हणाला,"गौरव तिवारी ही भूमिका साकारणं माझ्यासाठी सोपे नव्हतं. शूटिंगदरम्यान अनेक वेळा झोप येत नव्हती. मानसिक स्थितीवरही त्याचा परिणाम होत होता. मी या पात्राच्या पूर्णपणे मुळापर्यंत गेलो होतो".
advertisement
खऱ्या घटनेवर आधारित 'भय-द गौरव तिवारी मिस्ट्री'
'भय-द गौरव तिवारी मिस्ट्री' या सीरिजच्या शटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना करण म्हणाला,"मी साकारत असलेलं पात्र आव्हानात्मक होतं. त्यामुळे सेटवर गंभीर वातावरण असायचं. याच वातावरणातून घरी जाणं आणि घरी गेल्यावर पुन्हा आपल्या मूळ रुपात येणं हे माझ्यासाठी थोडं कठीण होतं. ही एक नॉर्मल हॉरर सीरिज असती तर खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या. पण एका खऱ्या व्यक्तीचे वास्तव आयुष्य पडद्यावर आणणे हा पूर्णपणे वेगळा अनुभव होता. स्वत:ला शांत करण्यासाठी मी अनेकदा आईची मदत घेतली आहे.
गौरव यांच्या मृत्यूपूर्वीचे काही दिवस
करणने गौरव तिवारीच्या शेवटच्या काळातील काही गोष्टीही सांगितल्या. तो म्हणाला की, गौरव यांनी आपल्या कुटुंबियांना आणि जवळच्या लोकांना वारंवार सांगितले होते की त्यांना बरं वाटत नाही आहे. काहीतरी चुकीचे जाणवत आहे. सीरिजबद्दल बोलताना गौरव म्हणाला,"माझा उद्देश गौरव तिवारी यांचा वारसा आणि त्यांचे काम योग्य पद्धतीने दाखवणे होता. मला आशा आहे की प्रेक्षक माझ्या मेहनतीला समजून घेतील आणि गौरव तिवारी आणि त्यांच्या टीमच्या वारशाला पुढे नेण्यात मदत करतील".
'भय – द गौरव तिवारी मिस्ट्री' ही एक वास्तविक कथानकावर आधारित सुपरनॅचरल थ्रिलर सीरिज आहे. यात करणसोबत कल्कि कोचलिनही दिसणार आहेत. या सीरिजमध्ये आयरीन व्हेंकट नावाच्या पत्रकाराची भूमिका करत आहे. गौरव तिवारी यांच्या कामाचा पर्दाफाश करण्यासाठी हे पात्र प्रयत्न करतं.
