जर तुम्हाला ‘दृश्यम’ किंवा ‘महाराजा’ सारख्या कथा आवडल्या असतील, तर हे चित्रपट त्याहूनही अधिक थरारक आहेत. या चित्रपटांचे क्लायमॅक्स पाहून तुम्ही अक्षरशः अवाक व्हाल.
'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर गडगडाट! चौथ्या आठवड्यातही थिएटर्स हाऊसफुल
तितली
दिल्लीतील एक तरुण, जो आपल्या गुन्हेगारी कुटुंबातून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण परिस्थिती त्याला परत त्या अंधाऱ्या जगात ओढते. कानू बहल दिग्दर्शित हा चित्रपट गुन्हा आणि भावनिक संघर्षाचं अचूक चित्रण करतो. Amazon Prime Video वर तुम्ही हा पाहू शकता.
advertisement
इलेव्हन
जुळ्या मुलांच्या हत्येचा तपास करणारा पोलिस अधिकारी स्वतःच सापळ्यात अडकतो. हा तमिळ क्राइम थ्रिलर चित्रपट सस्पेन्स आणि मेंटल मॅनिप्युलेशनने भरलेला आहे. Amazon Prime Video हा उपलब्ध आहे.
जोसेफ
एक निवृत्त पोलिस अधिकारी स्वतःच्या आयुष्यातील शोकांतिकेत गुंततो आणि अनपेक्षित सत्य उलगडतो. भावनिक आणि सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट तुम्हाला हादरवून टाकेल. याला IMDb रेटिंगवर 8 रेटिंग्स आहेत. Amazon Prime Video वर तुम्ही पाहू शकता.
कहानी
एका गर्भवती महिलेचा कोलकात्यातील शोध तुम्हाला अंतर्बाह्य हादरवतो. तिच्या आयुष्यातील सत्य जेव्हा उलगडतं, तेव्हा प्रेक्षक थक्क होतात. विद्या बालन इमरान हश्मीचा जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला खिळवून ठेवेल. Amazon Prime Video वर तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकता.
हसीन दिलरुबा
तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीचा हा चित्रपट सस्पेन्स, रोमांस आणि गुन्ह्याचं भन्नाट मिश्रण आहे. दोन भागांमध्ये सादर झालेला हा चित्रपट शेवटी असा ट्विस्ट देतो की तुम्ही थक्क व्हाल. Netflix वर तुम्ही हा पाहू शकता.
या पाच चित्रपटांमध्ये फक्त सस्पेन्स नाही, तर मानवी भावनांचं कंगोरे, नात्यांची गुंतागुंत आणि सत्याच्या शोधाची झुंजही दिसते.जर तुम्ही थ्रिलरचे शौकीन असाल, तर रात्रीची बिंज-वॉचिंग लिस्ट तयार आहे.