Dashavatar Collection : 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर गडगडाट! चौथ्या आठवड्यातही थिएटर्स हाऊसफुल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Dashavatar Collection : बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांच्या गर्दीत मराठी सिनेमा 'दशावतार' ने आपली ताकद दाखवून दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या लाटेतही हा मराठी सिनेमा ठाम उभा राहिला आहे.
मराठी सिनेमा </a>'दशावतार' ने आपली ताकद दाखवून दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या लाटेतही हा मराठी सिनेमा ठाम उभा राहिला आहे. 'दशावतार'चा चौथा आठवडा सुरू असूनही प्रेक्षकांची गर्दी कायम आहे. अजूनही दीडशे थिएटर्समध्ये आणि दोनशेहून अधिक शोमध्ये ‘दशावतार’ हाऊसफुल चालू आहे." width="1200" height="900" /> बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांच्या गर्दीत मराठी सिनेमा 'दशावतार' ने आपली ताकद दाखवून दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या लाटेतही हा मराठी सिनेमा ठाम उभा राहिला आहे. 'दशावतार'चा चौथा आठवडा सुरू असूनही प्रेक्षकांची गर्दी कायम आहे. अजूनही दीडशे थिएटर्समध्ये आणि दोनशेहून अधिक शोमध्ये ‘दशावतार’ हाऊसफुल चालू आहे.
advertisement
advertisement
मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले. दशावतार मुळे चित्रपट गृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली. कोकणातील अनेक बंद चित्रपट गृहांची दारे ‘दशावतार’ ने पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’ वर कमावले.
advertisement
काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर 'दशावतार' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात 'दशावतार' ची खूप प्रशंसा झाली. अशा रितीने मराठी चित्रपट उद्योगाला आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार चित्रपटाने केले आहे .
advertisement
advertisement
advertisement