तुमच्या घरातील शिळी चपाती आयुष्यात श्रीमंती आणणार, फक्त न चुकता हे उपाय करा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
अनेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर काही चपात्या शिल्लक राहतात. त्या फेकून देण्याऐवजी त्यांचा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून उपयोग केल्यास जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे मानले जाते.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी चपातीशी संबंधित काही सोपे उपाय प्रभावी ठरतात. दररोज चपाती बनवताना एक चपाती बाजूला ठेवून ती गायीस अर्पण केल्यास घरात सुख, शांतता आणि समृद्धी येते, असे मत आहे. हा उपाय विशेषतः शनिवारी केल्यास अधिक फलदायी मानला जातो.
advertisement
advertisement
advertisement