आदित्य साखरपुड्याला का तयार झाला याचं खरं कारण पारुला सांगतो. पारुचे वडिल मारुती मामा यांचं अपहरण झालं असून आदित्यला पारुशी नाही तर अहिल्याने ठरवलेल्या मुलीशी लग्न करण्याची धमकी दिली जाते. जर आदित्यने साखरपुडा करायला नकार दिला तर पारुच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. पारु आणि आदित्यसमोर मारुती मामांना शोधण्याचं नवीन संकट उभं असतं.
advertisement
दुसरीकडे मालिकेमध्ये सयाजी आणि अहिल्यादेवी यांच्यात वाद होतात. भावा बहिणींमध्ये पारुवरुन वाद होतात. सयाजीराव यांना पारुच घरची सून हवी असते. तर अहिल्याला मात्र तिने पाहिलेल्या मुलीशी लग्न करावं आणि आदित्यनेच पुढाकार घेतला असं सांगून सयाजीराव यांच्याशी वाद घालते. पारु आणि आदित्यची चांगली मैत्री असल्याचं सांगते.
Guess Who : एकाच दिवशी जन्मलेले TV चे हे दोन स्टार्स, आता मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स, ओळखलंत का यांना?
पारु आदित्य यांच्यातील बोलणं दिशा ऐकते. दिशा पारुच्या आयुष्यात आणखी अडचणी निर्माण करण्याचा प्लॅन करते. तर सयाजीराव पारु आणि आदित्यचं लग्न व्हावं यासाठी पुढाकार घेतात. मात्र अहिल्या या गोष्टीला नकार देते आणि तिने ठरवलेल्या मुलीसोबत आदित्यचा साखरपुडा होणार याची तारीख देखील जाहीर करते.
नव्या प्रोमोमध्ये सयाजी जखमी अवस्थेत मंडपात आलेला दाखवला आहे. तो आदित्यला अंगठी घालण्यापासून रोखतो आणि आदित्य सगळं काही खरं सांगून टाक असं म्हणतो. आदित्य पारुचा हात पकडून अहिल्यादेवी म्हणजे आईला सगळं खरं सांगतो, आदित्य आणि पारुच्या प्रेमाचं सत्य, लग्नाचं सत्य अहिल्याला सांगतो. त्याने आईचा संताप होतो असं या प्रोमोत दाखवलं आहे.
Sachin Pilgaonkar : 'गब्बर'ला खरंच सचिन पिळगावकरांनी शिकवले डायलॉग? ज्येष्ठ सिने पत्रकाराने केली पोलखोल
अहिल्यादेवीच्या आयुष्यात खोट्याला जागा नाही, मग तो माझा मुलगा असला तरीही, असं म्हणून आदित्यचा हात धरुन ती त्याला बाहेर काढते. आता अहिल्याचा हा रौद्र अवतार आदित्य आणि पारुच्या नात्याला काय नवं वळण देणार? त्यांचं हे सत्य अहिल्या कसं पचवणार? त्यांना पुन्हा घरात घेणार की सयाजी त्यांना आपल्यासोबत घेऊन गावी जाणार? असे अनेक प्रश्न सध्या आहेत. त्यामुळे या मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
आदित्यने आईसमोर प्रेमाची कबुली दिल्याने प्रेक्षक खूश झाले आहेत. मात्र त्याच वेळी अहिल्याचा रागही जो आजवर कधी मुलासाठी पाहिला नव्हतो तो या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. अहिल्यादेवीला मनवण्यासाठी पारु काय नवीन शक्कल लढवणार हे देखील पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.