Sachin Pilgaonkar : 'गब्बर'ला खरंच सचिन पिळगावकरांनी शिकवले डायलॉग? ज्येष्ठ सिने पत्रकाराने केली पोलखोल

Last Updated:

Sachin Pilgaonkar Gabbar Dialogues : शोले सिनेमात गब्बरचा तो अजरामर डायलॉग खरंच सचिन पिळगावकर यांनी त्यांना शिकवला होता का? ज्येष्ठ चित्रपट समीक्षकांनी यावर प्रतिक्रिया देत काही महत्त्वाचे खुलासे केलेत.

News18
News18
मुंबई : 'कितने आदमी थे...' शोलेमधील गब्बरला म्हणजे अभिनेते अमजद खानला हा डायलॉग नीट बोलता येत नव्हता तो मीच त्याला शिकवला, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. शोलेच्या चाहत्यांनी सचिन पिळगावकरांवर केलेलं ट्रोलिंग खूप चर्चेत आलं होतं. दरम्यान प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकुर यांनी सचिन पिळगावकर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत काही महत्त्वाचे खुलासे केला आहे.
कलाकृती मीडियाशी बोलताना दिलीप ठाकुर म्हणाले, "सचिन जींचं हे स्टेटमेन्ट ऐकून आश्चर्य वाटलं. शोले हा अमजद खानचा पहिला सिनेमा नाहीये. अमजद हा जयंत नावाचे अभिनेते होते 50-60च्या दशकात. 'मेरा गाव मेरा देश'मध्ये सुद्धा होते. जयंत यांची दोन मुलं इम्तियाज खान आणि अमजद खान. इम्तियाज खान अमजदच्या आधीच सिनेमात आला होता. तो अनेक सिनेमात आहे."
advertisement
"अमजदने लहानपणी अनेक सिनेमात काम केलं आहे. 'माया', 'लव्ह एन्ड गॉड' सारख्या सिनेमात त्याने लहानपणी काम केलं आहे. मोठेपणी त्याने चेतन आनंद यांचा 'हिंदुस्तान की कसम' सिनेमात छोटासा रोल केला आहे. अमजद खान हा रंगभूमीवरचा कलाकार आहे. पृथ्वी थिएटरमध्ये त्यांचं एक काम बघूनच जावेद अख्तरनी त्यांचं नाव रमेश सिप्पी यांना सुचवलं होतं. ज्याला या माध्यमाची माहिती आहे. रंगभूमीवरून आलेल्या कलाकाराला एक्सप्रेशन आणि आवाजाची पट्टी काय असते हे सगळ्यांना माहिती आहे."
advertisement
दिलीप ठाकुर पुढे म्हणाले, "सचिन जींनी जे सांगितलं त्यावर मी बोलायची काही गरज नाही. कारण सोशल मीडियावर शोलेच्या चाहत्यांनी, गब्बरच्या चाहत्यांनी इतकंच काय तर सचिन जींच्या चाहत्यांनीही सुद्धा जे काही भाष्य केलं आहे, मला वाईट वाटलं. ट्रोलिंग केलं."
सचिन पिळगावकर यांनी शोलेमध्ये रमेश सिप्पींबरोबर मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं, असंही एका मुलाखतीत सांगितलं होतं. याविषयी बोलताना दिलीप ठाकुर म्हणाले, "शोलेचे टायटल बघितले तर रमेश सिप्पींच्या सहाय्यकांमध्ये सचिन पिळगावकर हे नावच नाही. सात दिग्दर्शक होते पण हे नाव नाहीये. हे अधोरेखित करायला पाहिजे. रमेश सिप्पी हे असे दिग्दर्शक होते जे अशाप्रकारचा हस्तक्षेप करतील असं मला वाटत नाही.
advertisement
आता सचिन जींनी हे असं का म्हटलं याचं मला आश्चर्य वाटतं. सचिन जींचा आणि माझा परिचय हा देखील 40 वर्षांचा आहे. पण हे जे काही चाललंय याचं उत्तर माझ्याकडे नाहीये."
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar : 'गब्बर'ला खरंच सचिन पिळगावकरांनी शिकवले डायलॉग? ज्येष्ठ सिने पत्रकाराने केली पोलखोल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement