Guess Who : एकाच दिवशी जन्मलेले TV चे हे दोन स्टार्स, आता मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स, ओळखलंत का यांना?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Guess Who Marathi Actors : तुम्हाला माहिती आहे का फोटोमध्ये दिसणारी ही दोन्ही मुलं एकाच दिवशी जन्मली आहेत. दोघांचे बर्थडे एकाच दिवशी आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशातच या वर फोटोमध्ये दिसणाऱ्या या दोन चिमुकल्यांचे फोटो समोर आलेत. फोटोमध्ये दिसणारी ही दोन्ही मुलं प्रचंड क्यूट आहेत. दोघांच्या निरागसपणाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का फोटोमध्ये दिसणारी ही दोन्ही मुलं एकाच दिवशी जन्मली आहेत. दोघांचे बर्थडे एकाच दिवशी आहेत. हे दोघे मराठी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध असून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत.
फोटोमध्ये दिसणाऱ्या या गोड चिमुकल्या मुलीला पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटत आहे. तिचे निळे डोळे तर लक्ष वेधून घेत आहेत. ही चिमुकली मराठी टेलिव्हिजवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच तिनं नंबर मालिकेत काम केलं आहे. त्यानंतर पुढील 9-10 वर्ष तिनं सलग हिट मालिकेत काम केलं. ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली. प्रेक्षक तिला महाराष्ट्राची क्रश म्हणू लागले. मालिकेत काम केल्यानंतर तिनं तिचा मोर्चा मराठी सिनेमांकडे वळवा. तिच्या पहिल्याच सिनेमासाठी तिला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला.
advertisement
तर फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला त्याच्या बर्थडेचा केक कट करताना दिसत आहे. हा चिमुकला देखील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. त्याची सुरूवातही मराठी टेलिव्हिजनवरून झाली होती. त्याची पहिलीच मालिका प्रचंड हिट झाली. आजही ती मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. एका हिट मालिकेनंतर मात्र हा फार मालिकेत दिसला नाही. पण मोठ्या पडद्यावर मात्र त्याने कमाल केली. पहिल्या एक दोन सिनेमानंतर त्यानं भरारी घेतली आणि त्याच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
advertisement

आता फोटोमध्ये दिसणारे हे दोन्ही कलाकार एकत्र एकाच सिनेमात दिसणार आहे. फोटोमध्ये दिसणारी ही दोन चिमुकली मुलं म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता ललिता प्रभाकर आहेत. दोघेही आरपार या मराठी सिनेमात दिसणार आहेत. येत्या 12 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा एक प्रेम कहाणी आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
advertisement
हृता आणि ललित यांचा बर्थडे एकाच दिवशी असतो. 12 सप्टेंबर रोजी दोघे त्यांचा वाढदिवस साजरा करतात. हृताचा जन्म 12 सप्टेंबर 1993 साली मुंबईत झाला. हृता आज तिचा 31 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. तर अभिनेता ललिता प्रभाकरचा जन्म 12 सप्टेंबर 1987 साली कल्याण येथे झाला. ललित आज त्याचा 37 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : एकाच दिवशी जन्मलेले TV चे हे दोन स्टार्स, आता मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स, ओळखलंत का यांना?