Rohit Sharma : हिटमॅन म्हणाला 'मी पुन्हा येईन', रोहितने तो खास Video शेअर केला अन् रितिकाच्या डोळ्यात पाणी!

Last Updated:

Rohit Sharma Practice Video : टीम इंडियाचा वनडे कॅप्टन रोहित शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओवर पत्नी रितिका भारावरून गेली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं.

Rohit Sharma share Practice Video
Rohit Sharma share Practice Video
Rohit Sharma Viral Video : एकीकडे आशिया कपमध्ये टीम इंडियाने दमदार सुरूवात केली असताना आता दुसरीकडे वनडेचा कॅप्टन पुढच्या ऑस्ट्रेलिया सिरीजची तयारी करतोय. टीम इंडियाचा वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे. गुरुवारी हिटमॅनने सोशल मीडियावर नेट्सचा एक व्हिडीओ (Rohit Sharma share Practice Video) शेअर केला. यामध्ये तो जोरदार बॅटिंगचा सराव करताना दिसत आहे.

रितिका भारावरून गेली

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्ये रोहित खेळताना दिसणार आहे. त्याच्यासोबत विराट कोहलीही मैदानावर परतणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता नव्या उंचीवर पोहोचली आहे. अशातच रोहित शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओवर पत्नी रितिका भारावरून गेली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कमेंट करत म्हणाली, अंगावर काटा आलाय.
advertisement

मी पुन्हा येत आहे...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅचमध्ये परतण्यासाठी रोहित शर्माने तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये रोहित वनडेतून निवृत्त होणार असल्याचं म्हटलं होतं, पण आता रोहितनेच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो म्हणतो, 'मी पुन्हा येत आहे. मला इथं चांगलं वाटत आहे.'
advertisement
advertisement
भारतीय वनडे टीमचा सध्याचा कर्णधार रोहितने या वर्षी कसोटी क्रिकेट आणि 2024 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 67 कसोटी मॅचमध्ये 4,301 रन्स केले, ज्यात 12 सेंच्युरी आणि 212 चा उच्चांक समाविष्ट आहे. आता त्याचं पूर्ण लक्ष वनडे क्रिकेटवर आहे. त्याचे फॅन्स त्याच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
advertisement

रोहितची वापसी 

दरम्यान, रोहितची वनडे क्रिकेटमध्ये ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन मॅचच्या वनडे सीरिजमधून वापसी होऊ शकते. त्याने भारतासाठी शेवटची मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळली होती आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीमने विजेतेपद पटकावलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये रोहितने 76 रन्स केले होते. या कामगिरीबद्दल त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : हिटमॅन म्हणाला 'मी पुन्हा येईन', रोहितने तो खास Video शेअर केला अन् रितिकाच्या डोळ्यात पाणी!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement