पाकिस्तानी लॉलीवूड तसेच बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखविणाऱ्या अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संस्कृत बोलण्याच्या क्षमतेने सर्वांना आश्चर्यचकित केले. अलीने संस्कृतमध्ये देवी सरस्वतीची वंदना सादर केली.
पाकिस्तानी गायकाने गायली सरस्वती वंदना
advertisement
मुलाखतीदरम्यान अली खानने सांगितले की, तो उर्दू, हिंदी आणि संस्कृतमध्येही बोलू शकतो. अलीने मुलाखतीत एका संस्कृत वंदनेचं पठण केली. सरस्वतीची स्तुती सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं कौतुक केलं. वंदनेचे शेवटचे शब्द तो किंचित विसरला असला, तरी त्याची संस्कृतची समज आणि उच्चार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
https://youtube.com/shorts/MYvIcOqvulE?si=laBT9vARjOnwIk07
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही काम केले आहे
अली खानने केवळ पाकिस्तानातच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याने काजोलसोबत 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. ज्यामध्ये एक किसिंग सीनही होता. याशिवाय त्याने 'लक बाय चान्स', 'डॉन 2', 'द आर्चीज' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
भारतीय टीव्ही आणि ओटीटीवरही काम केले
अली खानने 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात', 'ये है राज' आणि 'धूप की दीवार' सारख्या ओटीटी मालिका यांसारख्या भारतीय टीव्ही शोमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. भारतीय प्रेक्षकांमध्येही त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून, सोशल मीडियावरही युजर्सकडून त्याची प्रशंसा होत आहे.
वापरकर्त्यांची प्रतिक्रिया अली खानच्या संस्कृत बोलण्याच्या क्षमतेने सोशल मीडियावर लक्ष वेधले. एका यूजरने लिहिले की, "देशातील लोक संस्कृत विसरत आहेत, परदेशातील लोक ते बोलत आहेत."
