Shahrukh Khan First Home : गौरीसाठी घेतला 'मन्नत', त्याआधी कुठे राहायचा शाहरुख; SRK चं पहिलं घर कोणतं?

Last Updated:

Shahrukh Khan First Home : शाहरुखने गौरसाठी मन्नत खरेदी केला पण त्याआधी शाहरुख कुठे राहायचा माहितीये? 

शाहरुख खानचं पहिलं घर
शाहरुख खानचं पहिलं घर
मुंबई : अभिनेता शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्याची नेहमीच चर्चा असते. मन्नत बंगल्याती उंची आता वाढणार आहे. त्यासाठी परवानगी देखील मिळाली आहे. शाहरुख खान अनेक वर्षांपासून त्याच्या मन्नत या बंगल्यात राहतोय. पण तुम्हाला माहिती का मन्नत हे शाहरुखचं मुंबईतील पहिलं घर नाही. शाहरुखने गौरसाठी मन्नत खरेदी केला पण त्याआधी शाहरुख कुठे राहायचा माहितीये?
शाहरुखच्या मुंबईतील पहिल्या घरासंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानचं पहिलं घर हे कार्टर रोड येथे आहे. अमृत असं त्याच्या घराचं नाव आहे. पण अमृत आता दिसेनासं होणार आहे. कारण शाहरुखच्या अमृत या घराचा पुनर्विकास होणार आहे.  मुंबईतील सर्वात पॉश एरियामध्ये असलेली शाहरुख ही प्रॉपर्टी त्याच्या आयुष्यातील आणि कुटुंबातील एक महत्त्वाची खूण आहे.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार या इमारतीवर अनेक बिल्डरांची नजर आहे. या मालमत्तेत शाहरुखच्या मालकीच्या टेरेस फ्लॅटचा समावेश आहे. काही वर्षांआधी शाहरुख खान हा फ्लॅट त्याचं ऑफिस म्हणून वापरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच 10 बांधकाम व्यावसायिकांनी या मालमत्तेचा पुनर्विकास करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. येत्या आठवड्यात, समिती दोन विकासकांना अंतिम रूप देईल आणि पुनर्विकासासाठी कोण अधिक योग्य आहे याचे मूल्यांकन करेल.
advertisement

विवेक वासवानी यांनी किंग खानच्या घराबद्दल खुलासा केला होता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-निर्माता विवेक वासवानी म्हणाले होते, "शाहरुख खानच लग्न होईपर्यंत तो माझ्या घरी राहत होता. गौरीशी लग्न केल्यानंतर ते ताज लँड्स एंडच्या शेजारी असलेल्या देवदत्तच्या घरी राहायला गेले. ते अजीज मिर्झाच्या घरात राहायला गेले. अजीजच्या पत्नीने तिची टीआयएफआरमधील नोकरी सोडली तेव्हा त्यांना देवदत्तकडे परत जावे लागले. त्यानंतर त्या रिकामी घरात शाहरुख राहायला गेला.
advertisement

शाहरुखने अमृतने फ्लॅट कसा खरेदी केला?

वासवानी यांनी सांगितले की, शाहरुख खान आणि गौरी लग्नानंतर माउंट मेरी येथील असुदा कुटीर येथे एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. या कठीण काळात चित्रपट निर्माते प्रेम लालवानी यांनी शाहरुखला गुड्डू चित्रपटात भूमिका ऑफर केला होता. शाहरुखने तेव्हा फ्लॅट घेण्यासाठी 40 लाख रुपये मागितले होते.  त्याबदल्यात चित्रपटासाठी तारखा देण्याचं आश्वासन त्यानं दिलं होतं. लालवानी यांनी शाहरुखला पैसे आणि त्या पैशातून त्याने अमृत हा फ्लॅट विकत घेतला.  ही मालमत्ता पूर्वी राजेश खन्ना यांचे मामा ए.के. ती तलवारी यांची होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shahrukh Khan First Home : गौरीसाठी घेतला 'मन्नत', त्याआधी कुठे राहायचा शाहरुख; SRK चं पहिलं घर कोणतं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement