फवाद खानचं भारतीय कनेक्शन
फवाद खान पाकिस्तानात राहत असला तरी त्याच्या कुटुंबाचे भारताशी संबंध आहेत. फवाद खानच्या वडिलांचा जन्म पंजाबमधील पटियाला येथे झाला. तर त्याच्या आईचे कुटुंब मूळचे लखनौचे होते. पण फाळणीनंतर सगळे पाकिस्तानात गेले. फवाद खानने पाकिस्तानच्या अशा काही टीव्ही शोमध्ये काम केले होते जे आजही लोकांना पाहायला आवडतात.
advertisement
( पाकिस्तानी अभिनेत्याने पंडीतासारखी म्हटली संस्कृत वंदना, ऐकून सारेच थक्क, VIDEO)
फवाद खान वर्कफ्रंट
'जिंदगी गुलजार है', 'हमसफर', 'बेहद', 'अरमान' आणि 'दास्तान' यांचा समावेश आहे. पण गेल्या वर्षी त्याने एका शोमध्ये काम करून खळबळ उडवून दिली होती. 'बरजाख' हा टीव्ही शो 2024 साली आला होता. यामध्ये फवाद खानसोबत सनम सईद होती. मात्र हा शो पाहताच संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली. कारण या शोमध्ये एका गे कपलचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. ही भूमिका या दोन्ही प्रमुख कलाकारांनी साकारली होती.
फवादच्या गे सीनमुळे खळबळ
या 6 भागांच्या मालिकेत अशी दृश्ये दाखवण्यात आली होती की पाकिस्तानी लोक हैराण झाले होते. सनम आणि फवादला हा शो साइन केल्यामुळे अनेक स्टार्सनी ट्रोल केले. बऱ्याच वादानंतर 'बरजाख' हा शो यूट्यूबवरून हटवावा लागला. सध्या हा शो OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर आहे.
फवाद पाकिस्तानची श्रीमंत अभिनेता
फवाद खानची गणना पाकिस्तानच्या श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर त्याला आलिशान गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे मोटारींचा मोठा संग्रह आहे.
